• Mon. Nov 25th, 2024

    धनगर आरक्षणासाठी फुलंब्रीत टोकाचं पाऊल, युवकाने अंगावर ओतून घेतले डिझेल पण…

    धनगर आरक्षणासाठी फुलंब्रीत टोकाचं पाऊल, युवकाने अंगावर ओतून घेतले डिझेल पण…

    म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री : येथील तहसील कार्यालयाच्या आवारात धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात त्वरित समावेश करण्यात यावा आणि त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी करून एका तरुणाने अंगावर डिझेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला सदर युवकाला त्वरित ताब्यात घेऊन तहसील कार्यालयाने जामिनावर सुटका केली.

    मंगेश गुंजाळ असे डिझेल अंगावर ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मंगेश गुंजाळ यांनी तहसीलदार यांना यापूर्वी निवेदन दिले होते. या निवेदनात म्हटले होते, ‘सरकारने लवकरात लवकर धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अमलबजावणी त्वरित करावी. सकल धनगर समाजाला आरक्षणाच्या सुविधा अनेक वर्षांपासून मिळत नाहीत. आरक्षण दिल्यास त्यांना आरक्षणातील लाभ मिळतील. सकल धनगर समाजाच्या वतीने कोकणवाडी रेल्वे स्टेशन रोड छत्रपती संभाजीनगर येथे रंगनाथ राठोड, हरिचंद्र वैध, संपत रोडगे यांनी १९ नोव्हेंबरपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. परंतु सरकारने अद्याप कोणतेही प्रकारची दखल घेतली नाही.
    जालन्यातील धनगर आरक्षणासाठीचे उपोषण सुटले; विविध मागण्यांचा विचार करण्याचे सरकारचे आश्वासन

    आंदोलनाची लवकरात लवकर दाखल घेण्यात यावी; मात्र दखल न घेतल्यास आपल्या कार्यालया समोर लोकशाही मार्गाने आदोलन केले जाईल.’ या निवेदनावर मंगेश गुंजाळ, एकनाथ ढेपले, किरण वाघ आदींच्या स्वाक्षऱ्या आहे. मात्र, मंगेश याने मंगळवारी सकाळी तहसील कार्यालयाच्या आवारात येऊन अंगावर डिझेल ओतून जाळून घेण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकानी त्याला पकडून पोलिसाच्या ताब्यात दिले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed