• Sat. Sep 21st, 2024
निवडणूक तेलंगनाची त्रास मात्र महाराष्ट्रातील तळीरामांना, नेमकं कारण काय? वाचा सविस्तर….

चंद्रपूर : तेलंगणा राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी येत्या ३० नोव्हेंबरला मतदान होत आहे. खरंतर, या निवडणुकीचा आणि महाराष्ट्राचा काही एक संबंध नाही. तरीही या निवडणुकीने महाराष्ट्रातील तळीरामांचा जीव भांड्यात पडला आहे. काय तर सीमावर्तीत भागातून दारूच्या पुरवठा होऊ शकतो. या कारणाने सीमावर्तीत भागातील देशी दारू दुकान, बीअर बार, बिअर शापी सलग ३ दिवस बंद असणार आहेत. या निर्णयाने सीमा वर्तीत भागातील तळीरामांचा जीव कासावीस झाला आहे.

तेलंगणा राज्यात विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. ११९ जागासाठी ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. प्रचाराच्या धुराळा तेलंगणा राज्यात उडतो आहे. मात्र, या निवडणुकीमुळे महाराष्ट्रातील तळीरामांचा जीव कासावीस झाला आहे. त्याला कारण काय तर? महाराष्ट्र- तेलंगणा सीमावर्तित भागातून मतदानाच्या दिवशी दारूच्या पुरवठा होऊ शकतो अशी शंका प्रशासनाला आल्याने सीमावर्तित भागातील बीअर बार, देशी दारू दुकान, बिअर शॉपी सलग तीन दिवस बंद करण्याचा निर्णय चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. हा निर्णय ऐकताच तडीरामांचा जीव भांड्यात पडला. आज ( मंगळवार ) सहा वाजता नंतर दारू दुकाने बंद होणार आहेत तीन दिवसाचा कोटा ( साठा ) खरेदी करण्यासाठी तळीरामानी मोठी गर्दी केली होती.

आज बंद, गुरुवारला सुरू…

तेलंगणा राज्यातील निवडणुकीचा पार्श्वभूमीवर आज सहा वाजता दारू दुकाने बंद होणार आहेत. गुरुवारला सहा वाजता दुकाने सुरु होणार आहेत. तर मतदान मोजणीच्या दिवशी दुकाने बंद असणार आहेत.

महाराष्ट्रातील ही गावे करणार मतदान…

तेलंगणा विधानसभेचा प्रचार जोरात सुरु आहे.या निवडणुकीत महाराष्ट्रातील या १४ गावातील ३५०० मतदार मतदानाचा हक्क बाजविणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्याचा शेवटच्या टोकावर जिवती तालुका आहे. या तालुक्यातील १४ गावावर महाराष्ट्र आणि तेलंगणा सरकार आपला अधिकार सांगतोय. या गावातील नागरिकांकडे दोन्ही राज्यातील आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आहे. इथले मतदार महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन्ही राज्यातील निवडणुकीत मतदान करतात. महाराष्ट्र सरकारच्या तुलनेत तेलंगणा सरकारने या गावात अधिक विकासात्मक कामे केली आहेत. त्यामुळे या गावातील नागरिकांचा झुकाव तेलंगणा राज्याकडे अधिक आहे. या गावांची प्रमुख मागणी होती वन जमिनीचे पट्टे.जमिनीचे पट्टे देण्यास महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले. दुसरीकडे तेलंगणा सरकारने जमिनीचे पट्टे वाटप केले आहेत.

तेलंगाणा निवडणूक अधिकारी सज्ज झाले आहेत. मुकादमगुडा, परमडोली, परमडोली (तांडा), कोठा, लेंडीजाला, महाराजगुडा, शंकरलोधी, पद्मावती, अंतापुर, इंदिरानगर, येसापुर, पलसगुडा, भोलापठार,लेंडीगुडा अशी तेलंगाणा राज्यात मतदान करणाऱ्या गावाची नावे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed