• Mon. Nov 11th, 2024
    शिक्षक भरती रखडली; महिलेचा माध्यमांसमोरच शिक्षण मंत्र्यांना प्रश्न, दीपक केसरकर भडकले, म्हणाले…

    बीड: बीड जिल्ह्यातील मुख्यमंत्र्यांचा दौरा हा अचानक रद्द झाला. मात्र या दौऱ्यादरम्यान होणारे कार्यक्रम अचानक दौरा रद्द झाल्याने आता होणार कसे असा प्रश्नचिन्ह पडला होता. मात्र यामध्येच अचानक शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी हा दौरा पूर्ण केला. या दौऱ्यादरम्यान बीडमधील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीडच्या ऐतिहासिक देवस्थान मानल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कपिलाधार मनमत स्वामी मठ या ठिकाणी दरवर्षी मोठा उत्सव साजरा केला जातो. यात धार्मिक पूजा पाठ संपल्यानंतर धर्म सभेचे आयोजन केले जाते.
    पुणे ते लोणावळा रेल्वेचा वेग वाढणार; स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणेचे काम पूर्ण, ‘असा’ होणार फायदा
    या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार होते. यासाठी जिल्हाभरात त्यांच्या स्वागतासाठी बॅनरबाजी करण्यात आली. मात्र या कार्यक्रम संपल्यानंतर भर व्यासपीठावर एक प्रकार घडला आहे. त्यात दीपक केसकर त्यात चक्क एका महिलेवर भडकलेले पाहायला मिळाले. बीड जिल्ह्यातील ऐतिहासिक धार्मिक मानल्या जाणाऱ्या स्थान म्हणजे कपिलाधार आणि या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो. या ठिकाणी श्री मनमत स्वामी यांची समाधी आहे. या समाधीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक भक्त येतात. याच ठिकाणी होते ते धर्मसभा या सभेत अचानक मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द झाल्यानंतर या सभेसाठी राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली.

    मात्र यावेळेस माध्यमांशी संवाद साधताना अचानक शिक्षण भरतीमधील एका महिलेने त्यांना अचानक प्रश्न विचारला. यावेळेस केसरकर हे भडकलेले पाहायला मिळाले. असा बेशिस्तपणा मला आवडत नाही आणि ऑनलाईन पद्धत ही चालू झालेली आहे. ती तुम्ही पाहिली नसेल आणि जर तुम्ही हा असा बेशिस्तपणा करत असाल तर विद्यार्थ्यांना काय शिकवणार? एक शिक्षक म्हणून मी माझ्या विद्यार्थ्यांचा विचार करतो. आतापर्यंत ह्या भरती कोणी काढल्या नाही पण यामध्ये मी भरती सुरू केले आहेत. मात्र यावेळेस तक्रारदार महिलेची प्रश्न हे वाढत जात असल्याने दीपक केसकर हे भडकले. हे बघा हा बेशिस्तपणा आहे. अशा तुम्ही सरकारी नोकरी करू शकत नाही असे दीपक केसरकर म्हणाले.

    नांदेडमध्ये तब्बल १११ एकर जमिनीवर होणार मनोज जरांगे पाटलांची उत्तर सभा, मराठा बांधवांकडून तयारी जोरात

    ते महिलेला पुढे म्हणाले की, तुम्ही हा बेशिस्तपणा करू नका. साईट ओपन झालेली आहे, ना मग तुम्ही माझ्यापर्यंत का आलात. थोडी श्रद्धा आणि सबुरी ठेवा. याला पाच वर्षात कुणीही भरती काढली नाही मी काढली आहे, ना असे दीपक केसकरांनी महिलेला बोलताना उद्गारले आहेत. मात्र या चर्चेनंतर याची चर्चा होत आहे. मात्र ऑनलाइन पद्धतीमध्ये रजिस्ट्रेशन होऊन देखील याची पुढची प्रोसेस होत नसल्याचे महिलेचे म्हणणं होतं. यासाठीच मी प्रश्न विचारते. मात्र यावर माझ्यापर्यंत का येतात प्रोसेस सुरू झाली आहे. ना होईल श्रद्धा आणि सबुरी ठेवा, असे उत्तर दिल्यानंतर महिलेने नाराज होत तिथं काढता पाय घेतला. मात्र दीपक केसकर यांचे हे उत्तर आणि खडे बोल योग्य होते का प्रश्न विचारणे किंवा तक्रार मांडणे ही चुकीची होती का असाही प्रश्न जन माणसांना पडला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed