• Sat. Sep 21st, 2024

नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका; २४ तासांत सरी बरसण्याची शक्यता, अभ्यासकांचा अंदाज

नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका; २४ तासांत सरी बरसण्याची शक्यता, अभ्यासकांचा अंदाज

नाशिक: हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यास पावसाने रविवारी झोडपून काढले. दरम्यान आज सोमवारी शहर आणि जिल्ह्याच्या काही भागात पावसाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, गारपीट होण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान अभ्यासकांनी सांगितले. नैऋत्य अरबी समुद्रात वाऱ्यांची स्थिती चक्राकार आहे. पूर्वेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या परिणामी दक्षिण गुजरातपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
रब्बीच्या स्वप्नावर कोसळले आभाळ; नाशिक जिल्ह्यात पावसाचा धिंगाणा, गारपिटीने पिकांची माती
दक्षिण अंदमान समुद्रात चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होत असल्याने परिणामी आज, सोमवारी नाशिकसह राज्यात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. बुधवारपासून पुन्हा थंडीची सुरुवात होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सध्या भारतीय विषुववृत्तीय समुद्र परिक्षेत्रात प्रवेशलेला ‘मॅडन ज्युलियन ऑसिलेशन’ एकापेक्षा अधिक अॅम्प्लिट्यूडच्या घेराने कार्यरत आहे. दक्षिण थायलंड आणि अंदमान-निकोबारच्या दक्षिणेकडे बंगालच्या उपसागरात चक्रीय वाऱ्याच्या स्थितीमुळे आज (दि. २७) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यातून चक्रीवादळ निर्माण झाल्यास त्याच्या दिशेवर पुढील हवामानाचा अंदाज अवलंबून असण्याची शक्यता हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली.

दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी मनसे पुन्हा आक्रमक, मनसैनिकांनी इंग्रजी पाट्या फोडल्या

नाशिक जिल्ह्यात आज पावसाची शक्यता असली तरीही गारपिटीची शक्यता नसल्याचे खुळे यांनी सांगितले. राज्यात मुंबईसह कोकणात आज पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात मात्र पावसाची तीव्रता वाढून, आज गारपीट होण्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. विदर्भातही आज गारपिटीची आणि उद्या (दि. २८) केवळ पावसाची शक्यता खुळे यांनी वर्तवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed