• Sat. Sep 21st, 2024

शरद पवारांचा भर पावसात लढ्याचा संदेश, निसर्गाची साथ नसली तरी देशाच्या ऐक्यासाठी संघर्ष…

शरद पवारांचा भर पावसात लढ्याचा संदेश,  निसर्गाची साथ नसली तरी देशाच्या ऐक्यासाठी संघर्ष…

नवी मुंबई : भारतीय हवामान विभागानं जारी केलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस सुरु आहे. या अवकाळीचा पावसाचा जसा शेतीला फटका बसत आहे. तसाच तो राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांना देखील बसताना दिसत आहे. नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र, मेळावा सुरु होण्याच्या वेळीच अवकाळी पावसानं सुरुवात केल्यानं हा कार्यक्रम आटोपता घ्यावा लागला. पण भरपावसात शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना एक मिनिट संबोधित करत भाषण आटोपत घेतलं. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड,महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, सक्षणा सलगर उपस्थित होत्या.

शरद पवार काय म्हणाले?

आजचा दिवस देशाच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिलं, त्या संविधानाचा सन्मान आजच्या संपूर्ण देशभर केला जातो. निसर्गाची साथ असो वा नसो, परिस्थितीवर मात करुन देशाच्या ऐक्यासाठी प्रयत्न करणं, हा विचार फुले आंबेडकरांनी, शाहू महाराजांनी आपल्याला दिला आहे. आज अनेक महिलांनी त्यांच्या संघर्षानं चांगले स्टॉल उभे केले पण त्यांची निराशा झाली. मला त्यांना एवढंच सांगणं आहे की निराशा आपल्या मनात येता कामा नये, असं शरद पवार म्हणाले. त्या निराशेवर मात करुन संघर्ष करुन, पुढं धैर्यानं जाऊ हाच कार्यक्रम राबवण्याचा निर्धार या दिवशी करुया, असं शरद पवार यांनी म्हटलं.
नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट, अवकाळी पावसाची हजेरी, वातावरणात बदल, कांदा द्राक्ष पिकं संकटात
आपण मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला आलात त्या बद्दल आभार मानतो आणि आयोजकाचं अभिनंदन करतो, असं शरद पवार म्हणाले.
Pune Rain : सातारा नाशिकनंतर अवकाळी पावसानं पुण्याला झोडपलं, डाळींब उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसानं यावेळी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, नवी मुंबई कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक, नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे
आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवी मुंबई राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील ,महिला अध्यक्षा सलुजा सुतार , जी एस पाटील संदीप सुतार आदिनी मेहनत घेतली.

शरद पवारांची सभा आणि पाऊस हे वेगळंच समीकरण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २०१९ मध्ये सातारा येथे विधानसभा निवडणूक आणि लोकसभा पोटनिवडणुकीच्या निमित्तानं भर पावसात सभा घेतली होती. या सभेची राज्यासह देशभर चर्चा झाली होती. त्यानंतर राज्यभर वातावरण निर्मिती झाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला निवडणूक निकालात फायदा झाल्याचं दिसून आलं होतं.

भाजप लोकसभेच्या २६ जागा लढविणार, देवेंद्र फडणवीसांकडून जागावाटप, अजित पवारांचं ‘नो कमेंट’

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed