• Sat. Sep 21st, 2024
बांधकाम साहित्यात १२ फूट लांबीचा भलामोठा अजगर, कल्याणजवळील कांबा गावातील घटना

म. टा. वृत्तसेवा, ठाणे (कल्याण) : कल्याण जवळील कांबा – वरप टाटा पॉवर परिसरात एका बांधकाम साईटवर असलेल्या बांधकाम साहित्यात लपलेल्या १२ फुट लांबीच्या अजगराला वन विभागाने प्राणी मित्रांच्या मदतीने ताब्यात घेतले असून त्याच्यावर आवश्यक उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार असल्याची माहिती वन विभाग आधिकाऱ्यांनी दिली.

कल्याण जवळील ग्रामीण भागात आजही जंगल असून या जंगलात मोठ्या प्रमाणावर सरपटणारे प्राणी सापडतात. मात्र, आता या परिसरात देखील इमारती उभारल्या जाऊ लागल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांचा अधिवास हिरावला जात असल्याने हे प्राणी मानवी वस्तीत आढळू लागल्याचे चित्र आहे. कल्याणपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कांबा – वरप टाटा पॉवर परिसरात मोठमोठे प्रोजेक्ट होऊ घातले असून यातीलच एका बांधकाम साईटवर मजुरांना बांधकाम साहित्यात साप असल्याचे दिसल्याने कामगारांमध्ये घबराट पसरली. यानंतर हा साप नसून अजगर असल्याचे कळताच मजूर हातातील काम टाकून पळाले.

Thane Fire News: ठाण्याच्या वाघबीळमध्ये अग्निकल्लोळ, घरात झोपलेल्या दोघांचा होरपळून मृत्यू
या घटनेची माहिती वन विभाग अधिकाऱ्यांना देण्यात आली. वन आधिकाऱ्यांनी वार रेस्क्यू फाऊंडेशनच्या प्राणी मित्रांच्या मदतीने घटनास्थळावरुन या अजगराची सुटका केली. हा अजगर १२ फुट लांबीचा असून त्याच्या शेपटीवर काही गाठी असल्याचे निदर्शनास आल्याने या अजगराला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कांबा – म्हारळ वरप या भागात बांधकामे सुरू असली तरी जवळच असलेल्या टीटवाळा, रायता परिसरात जंगल असून या जंगलातून हा अजगर आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उपचार झाल्यानंतर पुन्हा या अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार असल्याची माहिती वन आधिकाऱ्यांनी दिली.

सोने पुन्हा ऑल-टाइम उच्चांकाजवळ, आगामी काळात किती वाढणार दर? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed