• Sat. Sep 21st, 2024

सागरकन्या जिया रायला ‘श्रेष्ठ दिव्यांग बालिका’ पुरस्कार जाहीर; स्वमग्नग्रस्त श्रेणीत पोहोण्याचा विक्रम

सागरकन्या जिया रायला ‘श्रेष्ठ दिव्यांग बालिका’ पुरस्कार जाहीर; स्वमग्नग्रस्त श्रेणीत पोहोण्याचा विक्रम

मुंबई : ‘सागरकन्या’ अशी ओळख झालेल्या कुलाब्यातील जिया राय या स्व:मग्नग्रस्त विद्यार्थिनीला केंद्र सरकारने ‘श्रेष्ठ दिव्यांग बालिका’ पुरस्कार घोषित केला आहे. तिने स्व:मग्नग्रस्त असतानादेखील पोहोण्याचे अनेक विक्रम केले आहेत. त्याबद्दल हा सन्मान दिला जात आहे.

कुलाब्याच्या नौदल शाळेत शिकणारी जिया ही लहानपणापासूनच स्वमग्न असल्याचे जाणवू लागते. या स्थितीत तिची मानसिक स्थिती स्थिर राहण्यासाठी डॉक्टरांनी तिला जलतरण शिकविण्यास सांगितले होते. त्यानुसार तिने पाचव्या वर्षी जलवतरण शिकणे सुरू केले. याच जलतरणात जिया ही १४, २२ व ३६ किमी खुल्या पाण्यातील जलतरणातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विक्रमवीर आहे. याबद्दल तिला याआधी राष्ट्रीय बाल पुरस्कारदेखील मिळाला.
वाघांच्या प्राणिसंग्रहालयातील ‘झू मॅन’; आतापर्यंत २६ बछड्यांचे केले संगोपन, कोण आहे हा अवलिया?
जियाने १५ फेब्रुवारी २०२०ला एलिफंटा ते गेट वे, हे १४ किमी अंतर तीन तास २७ मिनिटांत पूर्ण केले होते. तिच्या त्या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स व आशिया बूक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली. त्यानंतर ५ जानेवारी २०२१ला जियाने स्वत:चाच विक्रम मोडत अर्नाळा ते वसई किल्ला, हे २२ किमीचे अंतर सलग सात तास पोहून यशस्वीरित्या पार केले. त्यानंतर १७ फेब्रुवारी २०२१ला तिने वांद्रे वरळी सी-लिंक ते गेट वे ऑफ इंडिया हे ३५ किमीचे अंतर आठ तास ४० मिनिटे पोहून पूर्ण केले. त्यानंतर तिने २० मार्च २०२२ला पाल्क समुद्रधुनी पोहोण्याचा विक्रम केला. २९ किमी अंतर १३ तास १० मिनिटे अखंड पोहून पूर्ण करीत २००४मधील भूला चौधरी यांचा विक्रम मोडला. याखेरीज चिल्का सरोवर पोहोणारी सर्वांत तरुणपटू म्हणूनही तिने विक्रम केला आहे.

जियाचे वडील मदन राय हे नौदलात ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर आहेत. तिच्या आई रचना, या कुलाब्यातीलच नौदल महिला असोसिएशनमध्ये सक्रिय आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed