• Sat. Sep 21st, 2024

नवनीत राणांच्या अडचणीत वाढ? वृक्षतोड प्रकरणी चौकशीचे आदेश देणार, चंद्रकांत पाटील म्हणाले…

नवनीत राणांच्या अडचणीत वाढ? वृक्षतोड प्रकरणी चौकशीचे आदेश देणार, चंद्रकांत पाटील म्हणाले…

अमरावती: डिसेंबर महिन्यात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अमरावती लगतच्या जंगलात एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाकरिता शेकडो एकरावरील जंगल उध्वस्त करण्यात असल्याची माहिती पत्रकार परिषदेत जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना देण्यात आली. पाटील यांनी त्यावर मी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तसेच अमरावतीचे पालकमंत्री दोन दिवसांच्या अमरावती जिल्हा दौऱ्यावर होते. दरम्यान त्यांनी आज सायंकाळी श्रमिक पत्रकार भवनात आयोजित मीट द प्रेस या कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी संवाद साधला.

अमरावती शहरालगत असलेल्या छत्रीतलाव जंगल परिसर हा इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर आहे. यासोबतच सायाळ, दुर्मिळ साप व इतर वन्य प्राण्यांचा सुद्धा या भागात मोठ्या प्रमाणात अस्तित्व आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या चारिटेबल ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून त्याकरिता सुमारे पाच ते सात लाख लोकसंख्या या इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये दाखल होणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जंगल तोडणार होत असल्याच्या आरोपी पर्यावरण प्रेमी करीत आहेत.
अंमली पदार्थ तस्कर ललित पाटील पुन्हा येरवडा कारागृहात, न्यायालयीन कोठडीत वाढ, पोलिसांची मागणी मान्य कारण…
याच प्रश्नाला उत्तर देत उत्तर देत अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की, पत्रकार परिषदेत मिळालेली माहिती खरी समजून मी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना तात्काळ देणार आहे, असं म्हटलं.
विद्यार्थ्यांचे गाऱ्हाणे ऐकण्यास पालकमंत्री दादा भुसेंची टाळाटाळ, अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप
अमरावती शहरात मागील अनेक दिवसांपासून वन्यप्राणी आणि मानवा मधील संघर्ष टोकाची भूमिका घेत आहे. अशातच आठवडाभरापूर्वी पोहरा जंगल परिसरातील एक बिबट रस्ते अपघातात दगावला तर एक बिबट अजूनही शहराच्या मध्यवस्तीत पाठ्यपुस्तक परिसरात आढळला होता. त्यातच आता बिबट्याच्या अधिवास असलेल्या परिसरात खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या चारिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला पाच ते सात लाख लोकसंख्या येणार असलेल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शेकडो वृक्षांची कटाई करण्यात आल्याने पर्यावरण प्रेमींनी या कार्यक्रमाला विरोध दर्शवत हा कार्यक्रम शहरात घ्यावा असे सुद्धा सुचवले आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारला असता त्यांनी यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
राजस्थान-छत्तीसगडमध्ये ४५० रुपयांना सिलिंडर देणार, महाराष्ट्राने काय पाप केलंय? : नाना पटोले
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed