• Sat. Nov 16th, 2024
    बेशुद्ध करुन अत्याचार; नंतर आईच्या प्रियकराची १४ वर्षीय मुलीला धमकी, कंटाळून तरुणीनं घर सोडलं अन्…

    छत्रपती संभाजीनगर: घटस्फोटानंतर गेल्या दहा वर्षापासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आईच्या प्रियकरानेच १४ वर्षीय मुलीवर दुधामध्ये औषध देऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नराधामाने एवढ्यावरच न थांबता मुलीचे विवस्त्र अवस्थेत व्हिडिओ काढत मुलीला धमक्या दिल्या. याप्रकरणी मुलीने घरातून पळ काढत पोलीस ठाण्यामध्ये आपली व्यथा सांगितली. याप्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये आईच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
    रुग्णालयात उपचार घेताना महिलेशी मैत्री, नंतर वारंवार अत्याचार, आता मुलासह जीवे मारण्याची धमकी, काय घडलं?
    याप्रकरणी चौदा वर्षीय पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून, पीडित मुलगी दोन वर्षाची असताना तिच्या आईचा पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाला. त्यानंतर अशपाक गफ्फर शेख या व्यक्तीसोबत आंतरजातीय आईने दुसरा विवाह केला. ते दोघेही एकत्र राहू लागले. मात्र काही दिवसानंतर अशपाक याने पीडितेच्या आईचा छळ सुरू केला. त्यांच्यामध्ये दररोज वाद होत गेले. त्यामुळे कंटाळलेल्या मुलीची आई बेपत्ता झाली. काही दिवसांनी सर्व कुटुंब पुंडलिक नगर भागामध्ये राहू लागले. यावेळी आरोपीने पीडित मुलगी ही मोठी झाल्यानंतर तिचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला.

    सातारा लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचाच हक्क, शिंदे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव आग्रही

    या निर्णयाला मुलीने विरोध केला. त्यानंतर अशपाकने मुलीला सांगितलेल्या स्थळी लग्न कर अन्यथा माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव, असं म्हणत बळजबरीने शरीरसंबंध ठेवायला सुरुवात केली. त्यानंतर मुलीला वेगवेगळ्या पदार्थांमधून औषध देऊन मुलीला बेशुद्ध करून अत्याचार करू लागला. दरम्यान या त्रासाला कंटाळलेल्या मुलीने अचानक घर सोडून मैत्रिणीचे घर गाठलं. दरम्यान मैत्रिणीला घडलेली घटना सांगितली. त्यानंतर महिला सुरक्षा समितीच्या सदस्यांच्या मदतीने तिचा जबाब नोंदवून या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मेघा माळी पुढील तपास करत आहे.

    मतदार जनजागृतीसाठी मतदारांशी विविध माध्यमातून संवाद; निवडणूक यंत्रणामार्फत राज्यभरात जनजागृतीवर भर – महासंवाद
    अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांची ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात १९ नोव्हेंबर तर ‘दिलखुलास’ कार्यक्रमात १८, १९ आणि २० नोव्हेंबरला मुलाखत – महासंवाद
    अशोक चव्हाण लेकीसाठी, तर सुनेसाठी खतगावकर मैदानात; नांदेडमध्ये सख्ख्या दाजी आणि मेव्हण्याची प्रतिष्ठा पणाला!

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed