म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : मुलांना लहानाचे मोठे करण्यासाठी पालक जिवाचे रान करतात. मात्र, वांद्रे परिसरात राहणाऱ्या दाम्पत्याने आपल्या पोटच्या गोळ्यांना विकल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखा युनिट ९च्या पथकाने मुलांना विकणाऱ्या माता-पित्याला अटक केली आहे. दोघेही ड्रग्जच्या नशेच्या आहारी गेले होते आणि नशा करण्यासाठी पैसे नव्हते म्हणून या दोघांनी दोन वर्षांचा मुलगा आणि नुकत्याच जन्मलेल्या मुलीची विक्री केली.
वांद्रे येथील भारतनगर परिसरात राहणाऱ्या बहिणीच्या घरी शब्बीर खान आणि त्याची पत्नी सानिया राहत होती. दोघेही अंमली पदार्थांची नशा करीत असल्याने यावरून घरात वारंवार भांडण व्हायची. त्यामुळे शब्बीर पत्नीसह सासरी जाऊन राहू लागला. चार ते पाच वर्षे सासरी राहिल्यानंतर ऑक्टोबरमध्ये शब्बीर पत्नीसह पुन्हा वांद्रे येथील बहिणीच्या घरी राहायला आला. या चार ते पाच वर्षांत शब्बीरला दोन मुलगे आणि ऑक्टोबरमध्ये एक मुलगी झाली होती; परंतु वांद्रे येथे आला त्या वेळी त्याच्यासोबत केवळ एकच मुलगा होता. बहिणीने याबाबत विचारले असता, दोघेही उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले.

काही दिवस स्थिरावल्यावर बहिणीने शब्बीरच्या नकळत सानियाला विश्वासात घेतले. त्या वेळी तिने दोन वर्षांचा मुलगा आणि नुकत्याच जन्मलेल्या मुलीला विकल्याचे तिने सांगितले. हा प्रकार गंभीर असल्याने शब्बीरच्या बहिणीने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. गुन्हे शाखा युनिट ९च्या पथकाने याची गंभीर दखल घेत शब्बीर आणि सानिया या दोघांना अटक केली. त्यांनी या मुलांची विक्री कुणाला केली याचा तपास पोलिस करीत आहेत.
बालकाची विक्री ६० हजारांना
शब्बीर आणि सानिया नशेच्या इतके आहारी गेले आहेत की, त्यासाठी त्यांची काहीही करायची तयारी असते. त्यातून दोघांनी दोन वर्षांच्या मुलास ६० हजारात; तर नुकत्याच जन्मलेल्या मुलीस केवळ १४ हजारांना विकल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले आहे.