• Sat. Sep 21st, 2024
Delisle Bridge: लोअर परळमधील डिलाइल पूल अखेर सुरू, पण आता एकच मागणी, जाणून घ्या

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : गेल्या पाच वर्षांपासून चर्चेत असलेला लोअर परळमधील डिलाइल रोड उड्डाणपूल गुरुवारपासून संपूर्ण क्षमतेने वाहनांसाठी खुला झाला. पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारा शेवटचा मार्ग वाहनांसाठी खुला केल्यानंतर या मार्गावरून वाहने जाऊ लागली. त्यामुळे स्थानिकांना दिलासा मिळाला. ना. म. जोशी मार्ग आणि गणपतराव कदम मार्गावरील लोअर परळ येथील डिलाइल पुलाच्या पोहोच रस्त्यांचे लोकार्पण आणि सरकत्या जिन्याचे भूमिपूजन मुंबई शहर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या शुभहस्ते गुरुवारी सायंकाळी झाले.

डिलाइल पुलावरून दोन्ही दिशेने वाहतूक सुरू होऊन दक्षिण मुंबईतील प्रवासासाठी नागरिकांना सुलभ पर्याय उपलब्ध झाला आहे. ना. म. जोशी मार्गावरील डिलाइल पुलामध्ये दोन्ही दिशेने प्रत्येकी तीन मार्गिका, तर गणपतराव कदम मार्गावर दोन्ही दिशेला प्रत्येकी दोन मार्गिकांमुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे. जुन्या पुलाच्या तुलनेत गणपतराव कदम मार्ग आणि ना. म. जोशी मार्गावर अतिरिक्त मार्गिकेचा पर्याय उपलब्ध झाल्याने वाहतूक सुरळीत व्हायला मदत होईल.

Mumbai News: CSMT स्थानकाच्या पुनर्विकासाला गती; ‘या’ कामांचा समावेश, ‘ही’ कामे पूर्ण
नवीन बांधण्यात आलेल्या पुलामध्ये चार नवीन जिने बांधण्यात येणार आहेत. तसेच दोन सरकते जिने जोडण्यात येणार आहेत. सेवा मार्गांची रुंदी वाढल्यामुळे तसेच पुलाखालील मोकळ्या जागेमुळे पादचाऱ्यांची वहिवाट पूर्वीपेक्षा सुरळीत होणार आहे. डिलाइल पुल हे नाव एका विदेशी माणसाचे असल्याने या पुलाला भारतीय व्यक्तीचे नाव देण्याची मागणी उपस्थित उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी केली. या पुलाच्या खाली मोकळ्या जागेत स्थानिकांच्या मागणीनुसार गार्डन, ओपन जीम आदी सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न असणार आहे. आयआयटी मुंबईच्या अहवालानंतर पश्चिम रेल्वेने हा पूल वाहतुकीसाठी जुलै २०१८ मध्ये बंद केला.
सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका, आधी कर्जमुक्ती करण्याची मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed