• Mon. Nov 25th, 2024

    Nashik News: विभागीय अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; अतिक्रमण काढताना महिलेची तक्रार, काय घडलं?

    Nashik News: विभागीय अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल; अतिक्रमण काढताना महिलेची तक्रार, काय घडलं?

    म. टा. वृत्तसेवा, सिडको : अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान जातिवाचक शिवीगाळ, तसेच दमदाटी केल्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात सिडको विभागीय अधिकारी, तसेच अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह जागामालकावर ॲट्रॉसिटी कलम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांना पूर्वकल्पना, नोटीस न देता, घरे तोडून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान केल्याचीही तक्रार या वेळी करण्यात आली.

    काय घडलं?

    मोलमजुरी करणाऱ्या वंदनाबाई किसन अंभोरे (वय ४८, रा. प्लॉट नंबर ३२, वृंदावननगर, कामटवाडे) यांनी अंबड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीत नमूद केले आहे, की वंदनाबाई अंभोरे व त्यांचे पती, तसेच तीन मुले सुरेंद्र खाडे यांच्या मालकीच्या जागेत पत्र्याच्या शेडमध्ये २५ वर्षांपासून राहत आहेत. जागा मालक सुरेंद्र खाडे यांच्या सांगण्यावरून चार ऑक्टोबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास महापालिकेचे विभागीय अधिकारी व अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पूर्वकल्पना, तसेच नोटीस न देता आमचे पत्र्याचे घर जेसीबीच्या साह्याने तोडले. घरातील संसारोपयोगी भांडीकुंडी, तसेच दागदागिने अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी सोबत घेऊन गेले. घर तोडताना घरातील महापुरुषांच्या छायाचित्रांचेही नुकसान करून कुटुंबाला जातिवाचक शिवीगाळ व दमदाटी केली.
    सातबारामुळे बाराच्या भावात; २ हजारांसाठी महिला तलाठी फसली, ACBकडून अटक, काय घडलं?
    या प्रकरणी सिडको विभागीय अधिकारी डॉ. मयूर पाटील यांच्यासह जागामालक सुरेंद्र खाडे व अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी व कर्मचारी व एका तोतया पोलिसाविरोधात अंबड पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *