• Sat. Sep 21st, 2024

संतापजनक ! दोन दिवसांच्या अर्भकाला उघड्यावर टाकलं, शरीरावरही गंभीर जखमा, पुण्यात माणुसकीला काळिमा

संतापजनक ! दोन दिवसांच्या अर्भकाला उघड्यावर टाकलं, शरीरावरही गंभीर जखमा, पुण्यात माणुसकीला काळिमा

पुणे : मुळशी तालुक्यातून मन हेलावणारी आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मुळशी तालुक्यातील अकोले गावाजवळ दोन ते तीन दिवसांचे जिवंत अर्भक सापडले आहे. एवढेच नाही तर त्या अर्भकाच्या लिंगाच्या जागेवर गंभीर जखमा झाल्या आहेत. रस्त्याच्याकडेला असलेल्या गवतात हे अर्भक सापडले आहे. या घटनेने स्थानिक नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुळशी तालुक्यातील अकोले गावाजवळ एका निर्जनस्थळी असणाऱ्या गवतात लहान बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. त्यामुळे गावातील काही स्थानिक नागरिकांनी जाऊन पाहिले असता त्यांना त्या ठिकाणी दोन ते तीन दिवसांचे जिवंत अर्भक आढळून आले आहे. हे अर्भक अज्ञात व्यक्तीने या ठिकाणी टाकले असून त्या अर्भकाच्या अवघड जागेवर प्रचंड गंभीर जखमा झाल्याचे दिसले. त्या अवघड ठिकाणी कापले असावे अथवा कुठल्या प्राण्याने लचके तोडले असावे असा अंदाज वर्तवला जात आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली.

मराठा आरक्षण मिळणार कधी? तरुणाचा संयम सुटला, विषारी द्रव्य प्राशन करत आयुष्य संपवलं

पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत त्या अर्भकाला पुढील उपचारासाठी पौड ग्रामीण रुग्णालय दाखल केले. त्याच्यावर तिथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला ससून रुग्णालयात दखल करण्यात आले आहे. सध्या त्या बाळाची प्रकृती स्थिर असून माणूसकीला काळीमा फासणारा हा प्रकार घडला आहे. या घटनेने मुळशी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

त्या दोन ते तीन दिवसांच्या बाळाची अवस्था पाहून अनेकांची मने हेलवली आहेत. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. ज्यांनी कुणी हे अर्भक टाकले आहे त्याला लवकरात लवकर अटक करुन त्याला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी मुळशीतील नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणी पुढील तपास करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

रस्ते अपघात टाळण्यासाठी वाहतूक विभागाचा अनोखा उपक्रम; वाहनचालकांना समजावण्यासाठी थेट यमराज रस्त्यावर

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed