सुनील कदम यांच्या पक्षात दोन मुले पत्नी आई आणि लहान भाऊ असा परिवार आहे. अंतरवाली सराटी येथे झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला सुनील कदम हे आवर्जून उपस्थित होते. त्याचबरोबर आरवी या गावांमध्ये मराठा आरक्षणासाठी साखळी धरणे आंदोलन करण्यात आले यामध्ये देखील त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता.
एकीकडे मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये मराठा आरक्षणाचा लढा तीव्र होत असताना दुसरीकडे परभणी जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मागील तीन महिन्यांमध्ये मराठा आरक्षणासाठी परभणी जिल्ह्यातील सात मराठा बांधवांनी आत्महत्या केली असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी नितीन देशमुख यांनी सांगितले आहे.
सुनील कदम यांच्या आत्महत्येनंतर परभणी जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये येऊन जोपर्यंत सुनील कदम यांना शासकीय मदत जिल्हा प्रशासन जाहीर करणार नाही तोपर्यंत सुनील कदम यांचा अंत्यविधी करणार नाही अशी भूमिका घेतली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने देखील मदतीचे आश्वासन दिल्यानंतर आता पोलीस ठाण्यात जवाब नोंदविण्यात येत आहे.
सुनील कदम यांच्या आत्महत्येनंतर आर्वी गावासह परभणी जिल्हाभरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News