– शहरांसाठी विशेष गाड्या
मध्य रेल्वेतील पुणे रेल्वे हा महत्त्वाचा विभाग आहे. पुण्यातून दिवासाला १२०पेक्षा जास्त गाड्या धावतात. त्यामध्ये मेल एक्स्प्रेस गाड्यांचा समावेश आहे. याबरोबरच रेल्वेकडून काही साप्ताहिक गाड्या चालविल्या जातात. यंदा दिवाळीच्या काळात लांब पल्ल्याच्या गाड्यांना खूपच ‘वेटिंग’ असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने नागपूर, दानापूर, गोरखपूर व इतर काही शहरांसाठी विशेष गाड्यादेखील चालविल्या होत्या. मात्र, दिवाळीच्या काळात सर्व रेल्वे गाड्यांना खूपच गर्दी होती.
– ‘यूपी’, विदर्भासाठी गर्दी
दिवाळी व छठपूजेमुळे उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांना जास्त मागणी होती; तसेच विदर्भात जाणाऱ्या रेल्वेला खूपच गर्दी असल्याचे दिसून आले. रेल्वे प्रशासनाने एक ते १९ नोव्हेंबर दरम्यान २२ विशेष रेल्वे गाड्यांच्या २६० फेऱ्या केल्या. त्यामुळे दिवाळीच्या काळात रेल्वेला तिकीट विक्रीतून चांगले उत्पन्न मिळाले.
– दिवसाला दीड लाख प्रवासी
पुणे रेल्वे विभागातून नोव्हेंबरच्या पहिल्या १९ दिवसांमध्ये २८.२ लाख प्रवाशांनी रेल्वेतून प्रवास केला आहे. त्यामधून रेल्वेला ६० कोटी ६९ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दिवाळी होती. त्या वेळी महिनाभरात ४१.५६ लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. त्यामधून पुणे रेल्वे विभागाला ७९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा दिवाळीच्या काळात दिवासाला साधारण दीड लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दिवसाला एक लाख ३६ हजार प्रवासी प्रवास करीत होते. यंदा १३ ते १४ हजार प्रवाशांची वाढ झाल्याचे दिसले.
दिवाळीच्या काळात रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. लांब पल्ल्याच्या सर्व गाड्यांना गर्दी असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी विशेष गाड्या सोडल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची सोय झाली आणि रेल्वेला उत्पन्नदेखील चांगले मिळाले आहे.
– डॉ. रामदास भिसे, वाणिज्य व्यवस्थापक व जनसंपर्क अधिकारी
एक ते १९ नोव्हेंबर दरम्यान रेल्वेचे प्रवासी
२८.२ लाख
एक ते १९ नोव्हेंबर दरम्यान रेल्वेचे उत्पन्न
६०.६९ कोटी
एक ते १९ नोव्हेंबर दरम्यान सोडलेल्या विशेष गाड्या
२२
ऑक्टोबर २०२२मध्ये रेल्वेचे प्रवासी
४१ लाख
ऑक्टोबर २०२२मध्ये रेल्वेचे उत्पन्न
७९ कोटी