बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात जिजाऊ माँ साहेब पतसंस्था, परिवर्तन किंवा इतर काही पतसंस्था यामध्ये मोठ्या प्रमाणावर घोटाळे झाल्याने या पतसंस्था बंद झाल्या आहेत.बीड शहरातील माळीवेस भागात मुख्य शाखा असलेल्या साईराम अर्बन या पतसंस्थेच्या मुख्य शाखेसह सर्वच शाखा बंद असल्याने ठेवीदारांनी मुख्य शाखेसमोर गर्दी केली आहे. हजारो ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी आहेत.
नुकतंच बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा बँकेचा प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा बीडची साईराम अर्बन को-ऑपरेटिव बँक देखील वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण साईराम को-ऑपरेटिव बँकच्या आतापर्यंत अकराहून अधिक शाखा आहेत. आणि या सर्वच्या सर्व शाखा एकाच वेळेला बंद झाल्याने ग्राहक आणि ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे. यामध्ये या बँकेचे सर्वेसर्वा शाहीनाथ परभणी हे देखील फरार असल्याने आता ही बँकदेखील पळून गेल्याची नागरिक चर्चा करत आहेत.
परभणे व्हिडीओच्या माध्यमातून आले समोर
या प्रकरणी बँकेचे सर्वेसर्वा शाहीनाथ परभणे यांनी एक व्हिडीओ प्रसारित करत आपली बाजू मांडली आहे. गेल्या १३ वर्षांपासून साईराम बँक सुरळीत सेवा देत आहे. मात्र, मागील दोन महिन्यांपासून बँकेसमोर अडचणी वाढू लागल्या. तसेच आजपर्यंत जवळपास ४० कोटी रुपये खातेदारांना वाटप केले असल्याचे परभणे यांनी म्हटले आहे. मात्र, काल काही शाखांमध्ये कॅश कमी असल्याने खातेदारांमध्ये संभम्र निर्माण झाला. खातेदारांनी मला थोडा वेळ द्यावा मी खातेदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे परभणे यांनी म्हटले आहे
Read Latest Maharashtra News And Marathi News