खारघरमध्ये राहणारे डॉ. नंदगोपाल आचारी व त्यांचे सहकारी जयंती मसुरीया, राहुल मेहता, पंकज तिरमनवार, विशाल काटमवार या सर्वांनी भागीदारीत खारघर सेक्टर-५मध्ये मेट्रिक सुपरस्पेशालिटी रुग्णालय सुरू केले आहे. येथे डॉ. आचारी हे वैद्यकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. या रुग्णालयाच्या अकाऊंट विभागात उज्ज्वला गव्हाणकर या महिलेला जानेवारी २०२२मध्ये कामाला ठेवण्यात आले होते. रुग्णांच्या विम्यासंबंधी कामांची जबाबदारी त्यांच्यावर होती.
एप्रिलमध्ये एका रुग्णाचे बिल भरण्यात आल्याचे डॉ. आचारी यांनी सांगण्यात आले. अन्य कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, उज्ज्वला गव्हाणकर या महिलेने ही रक्कम स्वत:च्या, पतीच्या व मैत्रिणीच्या बँक खात्यात वळते केल्याची माहिती डॉक्टरांना मिळाली. अधिक चौकशीत उज्ज्वला हिने नोव्हेंबर २०२२ ते एप्रिल २०२३ या कालावधीत रुग्णालयाच्या तब्बल १४ लाख नऊ हजार रुपये रकमेचा अपहार केल्याचे आढळले. डॉ. आचारी यांनी तिच्याकडे विचारणा केली असता, तिने अफरातफर करून रुग्णालयाच्या रकमेचा अपहार केल्याची कबुली दिली. त्यापैकी अडीच लाख रुपये तिने परत केले. उर्वरित रक्कम थोड्या दिवसांत देण्याचे कबूल केले होते.
त्यानंतर उर्वरित रक्कम भरण्याबाबत उज्ज्वला हिला रुग्णालयाकडून वारंवार संपर्क साधण्यात आला. मात्र तिने उर्वरित सव्वा आठ लाख रुपये जमा केले नाहीत. त्यामुळे रुग्णालयाने उज्ज्वला गव्हाणकर हिच्या विरोधात खारघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
Read Latest Maharashtra News And Marathi News