• Sat. Sep 21st, 2024

लेक आणि भाचा बुडू लागला, वडील वाचवायला गेले पण तेही बुडाले, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

लेक आणि भाचा बुडू लागला, वडील वाचवायला  गेले पण तेही बुडाले, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

चंद्रपूर : चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंदा पोडे, यांच्या सह तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये गोविंदा पोडे त्यांच्या चुलत्यांच्या अस्थींचं विसर्जन करण्यासाठी वर्धा इरई संगमाच्या ठिकाणी नदी पात्रात गेले असता ही घटना घडली. गोविंदा पोडे यांच्यासह त्यांचा मुलगा आणि भाच्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या पैकी दोघांचे मृतदेह सापडले आहेत. गोविंदा पोंडे यांचा शोध सुरु आहे.

चुलत्यांच्या अस्थिविसर्जनासाठी वर्धा- इरई नदीच्या संगमावर गेलेल्या पिता, पुत्र आणि भाचावर काळाने झडप घातली आहे. नदी पात्रात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. चेतन पोडे आणि गणेश उपरे हे मुलगा आणि भाचा नदी पात्राचा मुख्य प्रवाहात गेले होते. ते बुडू लागल्यानं त्यांना वाचविण्यासाठी गोविंदा पोडे धावून गेले. मात्र तिघांचाही अंत झाला.गोविंदा पांडुरंग पोडे ( ४७), चेतन गोविंदा पोडे ( १६ ) व त्यांचा भाचा गणेश रवींद्र उपरे ( १७) असे मृताची नावे आहेत.
राज्यात चंद्रपुरातील प्रदूषण पातळी ‘टॉप’वर, नेमके काय घडते? शहरातील स्थिती
प्राप्त माहिती नुसार,जिल्हातील नांदगाव ( पोडे ) येथील गोविंदा पोडे यांचे मोठे वडील घनश्याम पोडे यांचे ११ नोव्हेंबर रोजी वृदापकाळाने निधन झाले होते.आज ( रविवारी ) त्यांच्या अस्थिविसर्जन करण्यासाठी कुटुंबीय वर्धा – इराई नदीच्या संगमावर गेले होते. पूजा अर्चा करून अस्थीविसर्जन करण्यात आले. या दरम्यान चेतन पोडे, गणेश उपरे हे नदी पात्राच्या पाण्यात पोहत होते.पोहता पोहता ते नदी पात्राचा मुख्य प्रवाहात गेले.प्रवाहाचा वेग मोठा असल्याने त्या दोघांना बाहेर येणे शक्य झाले नाही.
पोलिसाची नजर फिरली अन् नको ते करुन बसला, CCTVमुळं पितळं उघड; नेमकं काय घडलं?
मुलगा आणि भाचा यांना वाचविण्यासाठी गोविंदा पोडे यांनी नदी पात्रात उडी घेतली.दोघांना वाचविण्याचा प्रयत्नात त्यांना ही जलसमाधी मिळाली. या घटनेची माहिती मिळताच तहसीलदार डॉ.कांचन जगताप,बल्लारपूर पोलीस ठाण्याचे निरिक्षक उमेश पाटील,चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीशसिहं राजपूत यांनी धाव घेतली. शोध मोहिमे दरम्यान चेतन पोडे आणि गणेश उपरे यांचे मृतदेह मिळाले आहेत. गोविंदा पोडे यांच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे.
किराणा दुकानात चिमण्यांच्या त्रास; दुकानदार वैतागला; पट्ट्यानं अनोखी शक्कल लढवली अन् अडचण दूर, काय घडलं?

सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी, मुख्यमंत्र्यांची नाश्त्यासाठी मामलेदार मिसळीला पसंती, बीलही स्वत भरलं!

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed