• Sat. Sep 21st, 2024

चलो पंढरपूर…! कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरसाठी धावणार विशेष ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक

चलो पंढरपूर…! कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूरसाठी धावणार विशेष ट्रेन, जाणून घ्या वेळापत्रक

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : कार्तीकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील कार्तिकी एकादशी निमित्त मोठ्या प्रमाणात प्रवासी जात असतात. या प्रवाशांच्या सुविधेसाठी विशेष रेल्वेचे नियोजन करण्यात आले आहे. पंढरपूरसाठी बीदर, आदिलाबाद आणि नांदेड येथून तीन विशेष रेल्वेची घोषणा करण्यात आली आहे. जालना मार्गे मनमाडहून एकही पंढरपूर रेल्वे देण्यात आलेली नाही.

रेल्वे विभागाने कार्तिकी एकादशीसाठी तीन विशेष रेल्वेच्या एकूण सहा फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष रेल्वे २२ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर या दरम्यान चालवल्या जाणार आहेत. यात बिदर ते पंढरपूर

रेल्वे क्रमांक ०७५१७ / ०७५१८ ही रेल्वे दोन्ही दिशेने भाळकी, कमालनगर, उदगीर, लातूर रोड, लातूर, धाराशीव, बार्शी टाउन आणि कुर्डूवाडी या रेल्वेस्थानकांवर थांबेल. तर ०७५०१ / ०७५०२ आदिलाबाद-पंढरपूर-आदिलाबाद ही विशेष रेल्वे किनवट, बोधडी, धानोरा, सहस्रकुंड, हिमायतनगर, हडगाव रोड, भोकर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी टाउन, कुर्डूवाडी रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे; तसेच रेल्वे क्रमांक ०७५३१ / ०७५३२ पंढरपूर-नांदेड-पंढरपूर ही विशेष रेल्वे प्रवासात दोन्ही दिशेला कुर्डूवाडी, बार्शी, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी, गंगाखेड, परभणी, पूर्णा रेल्वे स्थानकांवर थांबेल.

पंढरपूरसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे विभागाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, परभणी ते मनमाड या रेल्वे मार्गावरील एकही विशेष रेल्वे पंढरपूर यात्रेसाठी नियोजनात ठेवण्यात आलेली नाही. नांदेड विभागाने विशेष रेल्वेच्या बाबत जालना रेल्वे मार्गाचा नियोजनात विचार केला नाही. अशी माहिती समोर येत आहेत.
विश्वचषकाच्या फायनलसाठी रेल्वे प्रशासन सोडणार स्पेशल ट्रेन, जाणून घ्या वेळ…
अशी चालविली जाणार रेल्वे
रेल्वे क्रमांक कुठून-कुठे प्रस्थान आगमन दिनांक

०७५१७ बिदर – पंढरपूर २२.१५ ०६.२० २२ नोव्हेंबर
०७५१८ पंढरपूर-बिदर २०.०० ०४.३० २३ नोव्हेंबर
०७५०१ आदिलाबाद-पंढरपूर १४.०० ०७.३० २२ नोव्हेंबर
०७५०२ पंढरपूर-आदिलाबाद २०.०० १२.०० २७ नोव्हेंबर
०७५३१ पंढरपूर-नांदेड ०८.१५ २०.४० २३ नोव्हेंबर
०७५३२ नांदेड-पंढरपूर १९.२० ०७.३० २६ नोव्हेंबर

काचिगुडा – बिकानेर – लालगडसाठी विशेष रेल्वे

छठ आणि दिवाळीसाठी प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने काचीगुडा ते लालगड या दरम्यान विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ०७०५३ काचिगुडा- लालगढ ही रेल्वे १८ नोव्हेंबर (शनिवारपासून) आणि २५ नोव्हेंबर या दोन दिवशी चालविण्यात येणार आहे. तर ०७०५४ ही लालगड ते काचिगुडा रेल्वे २१ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर रोजी चालविण्यात येणार आहे. ही रेल्वे काचिगुडा येथून १८ आणि २५ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३० वाजता सुटणार आहे, तर लालगड काचिगुडा ही रेल्वे लालगडहून सायंकारी ७.४५ च्या दरम्यान काचिगुडाकडे जाणार आहे. ही रेल्वे कामारेड्डी, निजामाबाद, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, शेगाव, भुसावळ, अहमदाबाद, अबूरोड, जोधपूर, बिकानेर मार्गे जाणार आहे. ही विशेष रेल्वेची एकही फेरी जालनामार्गे सोडण्यात आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed