बीड: भारतीयांचं लक्ष हे सर्व आजच्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्याकडे लागलं आहे. यासाठी कुणी उपवास करत आहे तर कुणी अभिषेक करत आहे. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने मॅच जिंकण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र खरा प्रयत्न असतो त्या खेळाडूंचा. या खेळाडूंचं मनधैर्य आणि प्रोत्साहनासाठी भारतीय जनता त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून प्रोत्साहन देते.
मात्र असाच एक प्रसंग बीडमधील अंबाजोगाईत पाहायला मिळाला. एका ९० वर्षाच्या आजीने पहाटेपासूनच भारताने मॅच जिंकावी, म्हणून महादेवाचा जप चालू केला आहे. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मॅच पाहण्यासाठी जंगी तयारी सुरू आहे. याच माध्यमातून अनेकांनी नवस केले आहेत. तर महादेव गणपती त्याचबरोबर अनेक देवी देवतांना नवसही केले आहेत. अनेकांनी महाआरत्या ठेवून भारत ही मॅच जिंकावी, वर्ल्ड कप आपल्याकडे यावा यासाठी देवांना गार नाही घातले आहेत.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये उषा पाटील या ९० वर्षांच्या आजीबाईंनी भारताने वर्ल्डकप जिंकावा यासाठी पहाटेपासूनच महादेवाचा जप नाम सुरू केला आहे. यामध्ये या आजींचं क्रिकेट प्रेमही पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच या आजींनी भारतीय क्रिकेट संघाला प्रोत्साहन म्हणून आणि हा वर्ल्ड कप भारताने जिंकावं यासाठी सुरू केलेला नाम जप हा मॅच संपेपर्यंत सुरूच राहणार असल्याचे यावेळेस सांगण्यात आले आहे.