• Mon. Nov 25th, 2024

    जालन्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! वडील शेतकरी; मात्र पोरीची उंच भरारी, उच्च शिक्षणासाठी थेट जपानमधून निवड

    जालन्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! वडील शेतकरी; मात्र पोरीची उंच भरारी, उच्च शिक्षणासाठी थेट जपानमधून निवड

    जालना: जिल्ह्यातील निरखेडा गावाच्या शेतकरी कुटुंबातील संजीवनी अनिल पुरी या अभ्यासू, हुशार विद्यार्थिनीला जपान सरकारने MBBS साठीच्या उच्च शिक्षणासाठी निमंत्रित केलेले आहे. भारतीय विज्ञान संस्थेच्या वतीने देशातील ६० विद्यार्थ्यांसह जपान येथील अभ्यास दौऱ्यासाठी संजीवनी पुरीची निवड झाली होती. मागील आठवड्यातच या विद्यार्थ्यांचा जपान दौरा पार पडला.
    मनोज जरांगे पाटील यांची भेट, जातनिहाय जनगणना आणि मराठा आरक्षण, उदयनराजे भोसले म्हणाले ज्यांची मागणी असेल…
    यावेळी या ६० विद्यार्थ्यांनी जपानमधील वेगवेगळी विद्यापीठे तसेच जपानची इस्त्रोच्या धरतीवर असलेली अवकाश संशोधन संस्था जेस्का येथेही अभ्यास भेट दिली आहे. जालना शहराजवळील रामनगर गावाजवळील नीरखेडा या छोट्याशा शेतकरी कुटुंबातील ही मुलगी आहे. संजीवनीचे वडील अनिल पुरी हे शेती करतात. रामनगर येथील इंदिरा गांधी हायस्कूलमध्ये संजीवनीचे प्राथमिक शिक्षण झालेले असून सध्या ती खरपुडी येथील बळीराजा करिअर ॲकाडमीमध्ये नीट परीक्षेची तयारी करीत आहे. अभ्यासात तल्लख असलेल्या संजीवनी हिने तिचे शिक्षक संदीप नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हायजेनिक टी कपाची निर्मिती केली होती. यासाठी तिने पेंटेट मिळावे म्हणून अर्ज दाखल केलेला आहे.

    महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी गुन्हा दाखला झाला; आजोबांना अभिमानच वाटेल | आदित्य ठाकरे

    संजीवनीला MBBS नंतर MS करायाचे असल्याची भावना तिच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. जालना जिल्ह्यातून काही दिवसांपूर्वीच परतूर येथील अंबादास मस्के हा जपानच्या कंपनीत रुजू झाला असून त्यानंतर परदेशी शिक्षणासाठी जाणारी संजीवनी ही जालना जिल्ह्यासाठी गौरवाची बातमी आहे. जपान सरकारने एमबीबीएस करण्यासाठी शिष्यवृत्तीसह नोकरी देण्याची हमी दिली असून भविष्यात जपानमध्ये उच्च दर्जाचे वैद्यकीय शिक्षण घेण्याचे तिचे मनोदय असल्याचे तिचे वडील आणि शिक्षक यांनी सांगितले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed