• Sat. Sep 21st, 2024

पहाटेच्या वेळी अनर्थ घडला, आयशरची थांबलेल्या ट्रकला धडक, चालकाचा जागीच मृत्यू

पहाटेच्या वेळी अनर्थ घडला, आयशरची थांबलेल्या ट्रकला धडक,  चालकाचा जागीच मृत्यू

हिंगोली : अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या माळहिवरा पाटीजवळ मध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आयशर चालकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. वेगात असलेली आयशर गाडी समोरील ट्रक वर आदळली. या मध्ये आयशर चालकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथील शेख अनवर शेख कटूमिया यांचा या अपघातात जागेवरच मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून नांदेड जिल्ह्यातील हादगाव येथील आयशर चालक शेख अनवर हे आयशर टेम्पोमध्ये नागपूर येथून संत्री घेऊन नांदेड कडे जात असताना पहाटेच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली आहे. हिंगोली ते वाशिम महामार्गावर असलेल्या माळीवरा फाट्यावर समोर उभ्या असलेल्या केळीच्या ट्रकवर भरगाव वेगात येणाऱ्या आयशर टेम्पो ने धडक दिली या घटनेत आयशर च्या समोरील भागाचा अगदी भयानक चुराडा झाला आहे.

हा अपघात एवढा भयानक होता की, चालक शेख अनवर हे या अपघातात अडकून पडल्याने गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.अपघाताची घटना होताच हिंगोली ते वाशिम मार्गावर असलेली वाहतूक काही काळ मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली.
विदेशातून गावात आल्या, गावच्या सरपंच झाल्या, एका चुकीमुळे फॉरेन रिटर्न महिलेनं पद गमावलं, कारण…
हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले यांना ही माहिती मिळताच त्यांच्या पथकाने या ठिकाणी जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी आयशर टेम्पो अडकून पडलेल्या शेख अनवर यांचा मृतदेह बाहेर काढून पुढील उत्तरीय तपासणीसाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.
गॅस लिक झाल्याने घरात भीषण स्फोट, दिवाळीचे फराळ बनवताना अनर्थ; ऐन सणासुदीत आनंदावर विरजण
हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आयशर टेम्पो चालकाला पहाटे डुलकी लागली असावी ,असा देखील अंदाज यावेळी वर्तवला जात आहे. ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नात अपघातात झाला असल्याची देखील शक्यता पोलिसांकडून वर्तवली जाते.
मराठा समाजात जन्मलो हा माझा गुन्हा आहे का? डोळ्यात पाणी आणणारी चिठ्ठी लिहून मृत्यूला कवटाळलं

आमच्यासाठी निवडणूक सोप्पी; ४५ खासदार आणि २१५ आमदार जिंकून आणू; उदय सामंतांचा दावा

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed