तसेच ओबीसी समाजातील प्रमुख नेते आणि मराठवाडा, विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र विभागातून सभेसाठी ओबीसी समाजातील बहुसंख्य नागरिक येण्याची शक्यता आहे. दरम्यान, सभेसाठी होणारी गर्दी लक्षात घेता वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने वाहतूक मार्गामध्ये काही प्रमुख बदल करण्यात आले आहेत.
हे असतील पर्यायी मार्ग
१) सध्याचा मार्ग – शहागड अंबड मार्गे जालनाकडे येणारी वाहतुक
पर्यायी मार्ग: हरीओम हॉटेल वडीगोद्री समोरील उड्डाण पुलाखालून शहागड- पाचोड किनगांव चौफुली मार्गे जालना कडे येईल.
२) सध्याचा मार्ग -जालना – अंबड मार्गे शहागड कडे जाणारी वाहतुक
पर्यायी मार्ग: जालना-गोलापांगरी- पारनेर फाटा- किनगांव चौफुली-जामखेड फाटा मार्गे पाचोड वडीगोद्री- शहागड कडे जाईल.
३) सध्याचा मार्ग – घनसावंगी अंबड मार्गे जालना कडे येणारी वाहतुक
पर्यायी मार्ग: सुतगिरणी चौफुली मार्गे राणीउंचेगांव जालना कडे येईल.
४) सध्याचा मार्ग : पाचोड अंबड मार्गे जालना कडे येणारी वाहतुक
पर्यायी मार्ग: जामखेड फाटा किनगांव चौफुली मार्गे जालना कडे येईल.
५) सध्याचा मार्ग : पाचोड – अंबड घनसावंगी कडे जाणारी वाहतुक
पर्यायी मार्ग: पाचोड वडीगोद्री-शहागड तिर्थपुरी मार्गे घनसावंगी कडे जाईल
Read Latest Maharashtra News And Marathi News