• Mon. Nov 25th, 2024
    पाडव्याला गोडवा, गजाभाऊंसोबत कुठलेही भांडण नाही, रामदास कदम यांचा वादावर पडदा

    मुंबई/ रत्नागिरी : भविष्यामध्ये जर काही वाद-विवाद झाले तर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बोललं पाहिजे, परस्पर प्रश्न काढून माध्यमांकडे जाता कामा नये, अशी भूमिका आपण मांडली. एकनाथ शिंदे यांना तशा सूचना देण्याची विनंती केली. त्यामुळे आता खासदार गजानन कीर्तिकर यांच्याशी कोणतेही वाद नाहीत, गजाभाऊंना दिवाळीच्या शुभेच्छा, अशा शब्दात रामदास कदम यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर माध्यमांजवळ बोलताना प्रतिक्रिया दिली. त्यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर शिंदे गटातील दोन दिग्गज नेत्यांमध्ये गोडवा

    आपल्याला सगळ्यांना सोबत हातात हात घालून काम करायचं आहे. सगळे लोक आपल्यावर विश्वास ठेवून आलेले आहेत. परवा झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंपेक्षा देखील महायुतीला खूप मोठे यश मिळालं आहे. खूप मोठा विश्वास महाराष्ट्राने दाखवला आहे. असं असताना दोन नेत्यांमध्येच आपापसात वाद असल्याचे चित्र महाराष्ट्रासमोर असणे हे भूषणावह नाही, याची जाणीव मला देखील आहे. त्यामुळे भविष्यात दोघांकडूनही कुठला वाद होणार नाही, अशी प्रतिक्रिया रामदास कदम यांनी दिली आहे

    रामदास कदम यांनी कोकण दौऱ्यावर असताना विद्यमान खासदार असलेल्या गजानन कीर्तिकर यांच्या मुंबईतील लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलताना गजाभाऊ उभे न राहिल्यास सिद्धेश कदम हे उमेदवारीची मागणी करतील असं म्हटलं होतं. त्यानंतर या दोघांमध्ये मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावरून हा वाद सुरू झाला होता.

    पुढच्या वर्षात किती रजा मिळणार? २०२४ च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर, वाचा संपूर्ण यादी
    खाजगी वाहिनीशी बोलताना रामदास कदम संयम सुटला. या प्रश्नामध्ये रामदास कदम यांनी सांगितले की, मी आयुष्यभर लढलोय मला मारण्याच्या, मर्डर करण्याच्या अनेकांनी सुपार्‍या घेतल्या होत्या. आज साळस्कर येथे जिवंत नाहीत. या सगळ्याला साळस्कर साक्षीदार आहेत, त्यांनी एन्काऊंटर केले. एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून माझ्याकडे महाराष्ट्र बघतो आहे, पक्षासाठी मी कफन बांधून लढलोय, गजाभाऊ यांनी त्या प्रसिद्धीपत्रकात ३० वर्षांपूर्वी मला रामदास कदम यांनी पाडण्याचा प्रयत्न केला असं लिहिले होते ,पण त्यावेळी मी खेडमध्ये माझी निवडणूक लढवत होतो, दाऊद समोर लढत होतो आपण त्यावेळेला मुंबई कांदिवली येथील शाखाप्रमुख होतो आणि आपण जे काम केलं होतं त्या कामावरती गजाभाऊ निवडून आले होते या तीस वर्षात अनेकदा माझ्या घरी गजाभाऊ जेवले, हक्काने माझे मोठे भाऊ म्हणून भेटत राहिले, पण तेव्हा कधीच ते बोलले नाहीत आणि मग त्यांना इतक्या वर्षानंतर साक्षात्कार झाला का मी त्यांना पाडायला निघालो होतो, त्यामुळे एखाद्या माणसाला संपवण्यासाठी अशा पद्धतीने खोट्या प्रेसनोट काढणे हे कितपत योग्य ठरतं, असा सवाल पत्रकारांच्या प्रश्नावर रामदास कदम यांनी उपस्थित केला.

    ते पुढे म्हणाले की, त्यांनी केलेल्या या प्रसिद्धी पत्रकातील आरोपांमुळे माझा संताप झाला आणि मग तुम्ही कुठे स्वच्छ आहात? आपण जेव्हा दुसऱ्याकडे बोट दाखवतो, तेव्हा दोन बोटे आपल्याकडेही असतात, याचं भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे, असे रामदास कदम यांनी सुनावलं होतं.

    महाविकास आघाडीचं जागावाटप निश्चित? संभाव्य फॉर्म्युला समोर, कुठल्या मतदारसंघातून कोण लढणार?

    त्यामुळे आता या सगळ्याचं भान ठेवून भविष्यात कोणतेही आरोप एकमेकांवर करायचे नाहीत, काही असेल तर तो विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सांगून चर्चा करायची, त्यामुळे आता हा वाद मिटला असून आपण या माध्यमातून गजाभाऊंना दिवाळीच्या शुभेच्छा देतो, असेही रामदास कदम यांनी म्हणत या वादावरती पडदा टाकला आहे

    वाद मिटला, गजाभाऊंना दिवाळीच्या शुभेच्छा!

    Read Latest Maharashtra Updates And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *