• Mon. Nov 25th, 2024

    अजितदादा गटातील आमदार निधीवाटपावरुन नाराज, पण जयंत पाटलांकडून अजित पवारांची पाठराखण, म्हणाले…

    अजितदादा गटातील आमदार निधीवाटपावरुन नाराज, पण जयंत पाटलांकडून अजित पवारांची पाठराखण, म्हणाले…

    म. टा. प्रतिनिधी, मुंबई: राज्यातील सत्ताधारी पक्षातील खासकरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समर्थक आमदारांना निधीवाटपात अन्याय होत असल्याचा आरोप होत असला तरी, आमदारांना निधीवाटप हा सरकारचा अंतर्गत विषय आहे. राज्य शासनात वित्त व नियोजन विभागाचा कार्यभार अजित पवार यांच्याकडे असल्यामुळे त्यांच्या गटातील आमदारांवर निधीवाटपात अन्याय होत असेल असे मुळीच वाटत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

    दादा गटातले आमदार नाराज, अमित शहांच्या भेटीतही चर्चा, ‘त्या’ आमदारांचा थेट भाजपमध्ये प्रवेश : रोहित पवार

    प्रत्येक आमदाराला आपआपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी अधिकाधिक निधी हवा असतो. बदलत्या काळात आज चुकीच्या प्रथा, परंपरा व पायंडे पडत आहेत, असे मतही जयंत पाटील यांनी व्यक्त केले. देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेससह विरोधकांच्या इंडिया आघाडीस अनुकूल वातावरण असल्याचे निवडणूकपूर्व कल चाचण्यांत दिसत आहे. तथापि, त्या राज्यांच्या निकालानंतर लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपास वेग येईल, असा दावाही त्यांनी केला.

    शिंदे गटामुळे आमच्या अडचणी वाढताहेत, अजितदादा गटाची अमित शाहांकडे तक्रार? नेमकं काय घडलं?

    विरोधकांची इंडिया आघाडी आणि राज्यातील महाविकास आघाडीचा घटक या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील १५ जागा लढविण्यासाठी इच्छुक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया जवळपास निश्चित झाली आहे. बारामती, शिरुर, सातारा, कोल्हापूर, खान्देशात रावेर, नाशकात दिंडोरी, बीड, अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. निवडून येण्याचा निकष महत्त्वाचा गृहित धरून अन्य पक्षातील व्यक्तींचा उमेदवारीसाठी विचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही ते म्हणाले.

    आमच्यासाठी निवडणूक सोप्पी; ४५ खासदार आणि २१५ आमदार जिंकून आणू; उदय सामंतांचा दावा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed