• Sat. Sep 21st, 2024
दिवाळीत फटाक्यांची आतिषबाजी; आगीच्या १७ घटना उघडकीस, अग्निशमन दलामुळे परिस्थिती आटोक्यात

नागपूर: दिवाळीच्या काळात एकीकडे लोकं मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात सण साजरा करत होते. दुसरीकडे शहरातील १७ ठिकाणी दिवाळीच्या आतिषबाजीत फटाक्यांमुळे आगीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र सुदैवाने कोणताही जीवितहानी झाली नसली तरी घरांमध्ये ठेवलेले सामान जळून खाक झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी सर्व आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळली.
ऐन दिवाळीतच अनर्थ! खेळता खेळता अंगावर गरम पाणी पडलं; चिमुकलीच्या अचानक जाण्याने कुटुंब हळहळलं
रविवारी सायंकाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात ठिकठिकाणी फटाके फोडण्यास सुरुवात झाली होती. काही नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे आगीच्या घटना घडल्या. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात आगीच्या १७ घटनांची नोंद करण्यात आली. फटाक्यांमुळे घराला आग लागल्याची पहिली घटना गणेशपेठ पोलीस ठाण्यांतर्गत घडली. गणेशपेठ येथील कुंभलकर कॉलेजला लागून असलेल्या मुकेश जोपाटे यांच्या घराला आग लागली. मात्र, अग्निशमन विभागाने तातडीने या ठिकाणी आग विझवली. ही घटना घडली तेव्हा घरात लोक उपस्थित होते. आग लागल्याचे समजताच सर्वजण घराबाहेर आले.

या घटनेची माहिती तात्काळ पोलीस व अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळ गाठून आग विझवण्यास सुरुवात केली. मात्र, तोपर्यंत घरात ठेवलेले सामान जळून राख झाले होते. तर त्रिमूर्ती नगरमध्ये ३, लकडगंजमध्ये २, तर गंजीपेठ, कॉटन मार्केट, सुगत नगर, वैशालीनगर, महाल भागात आगीच्या घटना घडल्या. शंकरनगर येथील दंडीगे लेआऊटमधील एका सभागृहाचा छताला आग लागली. सुगतनगर येथील महापालिका शाळेजवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागली. आग पसरण्यापूर्वीच त्यावर नियंत्रणात आणण्यात आले.

निधी मिळत नाही म्हणून रडू नका, धमक दाखवा ; वडेट्टीवारांची अजित पवारांवर टीका

दिवाळीत फटाक्यांमुळे ११ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये फटाक्यांच्या आवाजामुळे डोळ्यांना किंवा शरीराच्या इतर भागात किंवा कानाला त्रास होऊन वैद्यकीय रुग्णालयात पोहोचलेले ११ रुग्ण आहेत. यामध्ये ८ ते ११ वर्षे वयोगटातील ४ मुलांचाही समावेश आहे. फटाक्यांमुळे काही जण किरकोळ भाजले आहे. बहुतांश रुग्णांवर उपचार करून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याची माहिती वैद्यकीय प्रशासनाने दिली. अनेक खासगी रुग्णालयातही या रुग्णांची नोंद करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed