• Sat. Sep 21st, 2024
गुड न्यूज: मध्य-पश्चिम रेल्वेच्या ९१९ विशेष फेऱ्या, रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय; जाणून घ्या

मुंबई : दिवाळीच्या सुट्टीनिमित्त देशभरातील पर्यटनस्थळांसह १२ ज्योतिर्लिंग आणि तीर्थस्थळी प्रवाशांचा ओघ वाढता आहे. यामुळे गर्दी व्यवस्थापनासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने एकूण ९१९ विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तर, खासगी बसगाड्यांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे.

१४ लाख प्रवाशांना फायदा

– गेल्या वर्षी मध्य रेल्वेच्या २७० उत्सव विशेष एक्स्प्रेस फेऱ्या

– यंदा उत्सव विशेष फेऱ्यांची संख्या ५०९

– विशेष फेऱ्यांमुळे ७.५० लाख प्रवाशांना होणार फायदा

– याव्यतिरिक्त नियमित रेल्वे फेऱ्या सुरूच

– उत्सव आणि नियमित फेऱ्यांसाठी लोकोपायलट ते पॉइंट्समन असे सर्व वर्गांतील कर्मचारी कार्यरत

– लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर ३७१ मेल-एक्स्प्रेस, १३३ पॅसेंजर आणि ४६ उत्सव विशेष अशा एकूण ५५० रेल्वे डब्यांमधून प्रवासी वाहतूक

– पश्चिम रेल्वेच्या मुंबईसह ४९ मार्गांवर ४१० विशेष फेऱ्या

– या फेऱ्यांचा सात लाख प्रवाशांना फायदा

‘एसटी’चीही दिवाळी, १० दिवसांत तब्बल २०० कोटींचा महसूल; धनत्रयोदशीचा मुहूर्त फळला

मुंबई-धुळे विशेष गाडी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते धुळे विशेष एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. गाडी क्रमांक ११०११ सीएसएमटी ते धुळे एक्स्प्रेस आज, सोमवारी १३ नोव्हेंबरला सीएसएमटीवरून दुपारी १२ वाजता सुटेल आणि धुळे येथे रात्री ८.५५ वाजता पोहोचेल. या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, निफाड, लासलगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, जामदा, शिरूड येथे थांबा आहे. गाडीला १६ डबे असून यामधील एक वातानुकूलित चेअर कार, १३ विनावातानुकूलित चेअर कार डबे (पाच आरक्षित आणि आठ विनाआरक्षित) एक सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड्स ब्रेक व्हॅन अशी संरचना आहे.

भारताने नवव्या सामन्यात ९ गोलंदाज का वापरले, रोहित शर्माने अखेर खरं ते सांगितलंच…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed