• Sat. Sep 21st, 2024
बड्या अधिकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा, पोलीस दलाची लक्तरे वेशीवर, रक्षकच भक्षक…

धुळे : धुळे जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यावर मध्यरात्री उशिरा देवपूर पोलीस स्थानकात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. या गंभीर प्रकरणामुळे पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाली असून या घटनेमुळे पोलीस दलासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आणि ज्यांचे शोषण झाले आहे त्यांच्या रक्षणाची जबाबदारी असलेला रक्षकच भक्षक झाला असल्याची चर्चा जिल्हाभर होत आहे.

महसूल मंत्र्यांच्याच जिल्ह्यात वाळूतस्करांची मुजोरी वाढली,थेट तलाठ्यालाच मारहाण
धुळे जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांची नुकतीच धुळे जिल्हा सायबर सेल प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच त्यांची नंदुरबार जिल्ह्यात बदली झाली. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचा एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला होता.

भरधाव ट्रकची महिला API अधिकाऱ्याच्या बाईकला धडक, भीषण अपघातात पाय धडावेगळा
तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांचा एक अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने धुळे शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ माजली होती. याप्रकरणी एका महिलेने देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून कलम 354 A, 354 ब, 354 ड, 509, 506, 34 तसेच माहिती आणि तंत्रज्ञान कलम 67,67 A अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यातील पोलीस दलातील अधिकाऱ्यावर अशा पद्धतीने गुन्हा दाखल होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान या घटनेमुळे सध्या विविध चर्चा रंगल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed