• Mon. Nov 25th, 2024
    तुम्ही गावात आलेच कसे? मराठा बांधवांनी आमदारांना जाब विचारला, गाडीच्या खाली उतरवलं

    परभणी : मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत परभणी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना गाव बंदी करण्यात आली आहे. तसे फलक सुद्धा लावण्यात आले आहेत. असे असताना गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथे एका कार्यक्रमाला गेले असताना संतप्त मराठा बांधवांनी त्यांची गाडी अडवली आहे. गावात राजकीय नेत्यांना बंदी घालण्यात आली असताना सुद्धा तुम्ही गावात आले त्याचे असा प्रश्न देखील त्यांना विचारण्यात आला आहे.

    मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी परभणी जिल्ह्यामध्ये विविध मार्गाने आंदोलने केली जात आहेत. तर जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आलेली आहे. याचा फटका राजकीय नेत्यांना बसत आहे. गावबंदी केली असताना सुद्धा गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथे कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी गेले होते.

    राजकीय नेत्यांना गावबंदी, तरीही गुट्टेंचे पदाधिकारी गावात दाखल, मराठा समाज आक्रमक, कार्यक्रम उधळला
    त्यांची गाडी गावात गेल्यानंतर संतप्त झालेल्या मराठा समाज बांधवांनी त्यांची गाडी अडवली. त्यांच्या गाडीसमोर घोषणाबाजी केली आणि रत्नाकर गुट्टे यांना गाडीतून खाली उतरण्यासाठी भाग पाडले. रत्नाकर गुट्टे हे गाडीतून खाली उतरल्यानंतर मराठा समाज बांधवांनी राजकीय पुढार्‍यांना गावबंदी असताना तुम्ही गावात आलेच कसे? असा प्रश्न विचारला. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तुम्ही कुठेही फिरू नये, अन्यथा तुम्हाला मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे देखील यावेळी मराठा समाज बांधवांनी आमदार रत्नाकर गुट्टे यांना ठणकावले. यावेळी आ. रत्नाकर गुट्टे यांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देऊन आंदोलनाला समर्थन दर्शवलं.

    मराठा समाज पूर्वीपासूनच ओबीसीत होता, त्यांना जे फायदे मिळतायत ते सगळे आम्हालाही हवेतच: मनोज जरांगे पाटील
    याआधी देखील मानू तेथे एका कार्यक्रमाला आमदार राहुल पाटील गेले होते. त्यावेळी देखील त्यांना मराठा समाज बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे त्यांना कार्यक्रमातून काढता पाय घ्यावा लागला होता. तर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर हे पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे कार्यक्रमाला गेले होते, त्यावेळी त्यांची देखील गाडी संतप्त मराठा समाज बांधवांनी अडवून एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली होती. राजकीय नेत्यांनाच गाव बंदी करण्यात आली असल्याने नेत्यांची मात्र चांगलीच अडचण होत आहे.

    आमदार रत्नाकर गुट्टे यांच्या कार्यकर्त्यांचा उद्घाटनाचा कार्यक्रमाला मराठा बांधवांचा विरोध

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed