• Sat. Sep 21st, 2024

दिवाळीला गावी आलेल्या तरुणावर काळाचा घाला, गाडीवरील ताबा सुटल्याने अनर्थ, अपघातात तरुण जागीच ठार

दिवाळीला गावी आलेल्या तरुणावर काळाचा घाला, गाडीवरील ताबा सुटल्याने अनर्थ, अपघातात तरुण जागीच ठार

सातारा: बेकायदेशीर वाहतूकीमुळे आणि चालकांच्या बेजबाबदारपणामुळे अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील इंजबाव – म्हसवड या रस्त्यावर झालेल्या अपघातात एका तरुण जागीच ठार झाला आहे. बापूसाहेब तुकाराम कापसे (वय 28) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या अपघाताची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात झाली आहे, अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी दिली.

घटनास्थळ व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंजबाव येथील बापूसाहेब तुकाराम कापसे हा त्याच्या मालकीची गाडी घेऊन रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास म्हसवडकडे यायला निघाला होता. यावेळी महादेव मंदिरानजीक आल्यावर त्याचा गाडीवरील ताबा सुटला. गाडी रस्त्यावरून पन्नास फूट निर्जन ठिकाणी पडली. यामध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून, गाडी चालवत असलेला बापूसाहेब कापसे हा जागीच ठार झाला.

महसूल मंत्र्यांच्याच जिल्ह्यात वाळूतस्करांची मुजोरी वाढली,थेट तलाठ्यालाच मारहाण

बापूसाहेब मुंबई कुलाबा येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास होता. चार दिवसांपूर्वीच दिवाळीसाठी बापूसाहेब त्याच्या पत्नीसह इंजबाव या गावी आला होता. पत्नीला माहेरी सोडून तो इंजबाव गावी राहत होता. रात्री अकरा वाजता काही कामानिमित्त म्हसवडकडे येत असताना त्याचा गाडीवरील ताबा सुटून गाडीचा अपघात झाला. त्यात तो जागीच ठार झाला.
दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या अपघाताची फिर्याद बाळू बाबा कापसे यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ तपास करीत आहेत.

दिशा सालियन प्रकरणात तक्रारदाराला ५० कोटींची ऑफर दिली; नितेश राणेंचा दावा


Read Latest Maharashtra News And
Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed