• Mon. Nov 11th, 2024
    मुंबईत रस्ते घोटाळ्याचा आरोप, आदित्य ठाकरेंच्या निशाण्यावर आयुक्त आणि मुख्यमंत्री शिंदे

    मुंबई : शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून मुंबईतील रस्त्याच्या कंत्राटात घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर आयुक्तांनी कंत्राटदाराविरोधात टर्मिनेशनची नोटीस काढली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्यावर निशाणा साधला आहे.

    यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, मी प्रशासकांना प्रश्न विचाराला होता की, बेस्ट, बीएमसीच्या कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बोनसबद्दल मी सवाल केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेत कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला. त्यानंतर दुसरं ट्विट केलं होतं ते म्हणजे मुंबईतील रस्त्यांची ५० टक्केही कामं पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे या कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आयुक्तांनी कंत्राटदाराच्या विरोधात टर्मिनेशन नोटीस काढली. त्यामुळे मुंबईकरांचे पैसे वाचणार आहेत. हा २४ तासात झालेला डबल धमाका आहे.

    एका ट्विटमुळे डबल धमाका, बेस्ट-बीएमसीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळाला – आदित्य ठाकरे

    मुंबईत साधारण ११ महिने मी धरलेला विषय रस्त्याचा घोटाळा, मेगा रोड स्कॅम जानेवारीत समोर आणला होता. त्यावेळी मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत, रस्त्यांबद्दल ५००० कोटींचे कंत्राट दिले. मग ते रद्द केले. त्यानंतर ते ६००० कोटींचे केले. ॲडव्हान्स मोबलायझेशन आणि मुख्यमंत्र्यांच्या मित्रांना फायदा होईल हे यावेळी पाहिलं गेलं. पत्रकार परिषदेमुळे सव्वा सहाशे कोटी फायदा होणार होता, त्यांना तो रद्द करावा गेला. मुंबईचे हजार कोटी तिथे आपण वाचवले.

    आदित्य ठाकरेंनी दुपारी प्रश्न मांडला, काही तासांतच एकनाथ शिंदेंकडून बीएमसीच्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर
    पावसाळ्यानंतर जी कामं सुरू होणं अपेक्षित आहेत ती कामे कुठेही दिसत नाही. रस्त्यांची कामं व्हायला हवी तशी होत नाहीत. मुंबईतील ५० टक्केही रस्ते पूर्ण करू शकले नाहीत. कालच्या ट्विटनंतर टर्मिनेशनची नोट काढली होती, आम्हीही बोलू शकलो असतो की विजय झाला आमचा. पण २५ वर्षाचा अनुभव आहे. आम्हाला हे कसं चालवायचं हे ठाऊक आहे. आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना घोटाळ्यांमध्ये मदत करणं हे योग्य नाही, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्तांवर निशाणा साधला.

    सुशांत सिंग राजपूत प्रकरणात अटक टाळण्यासाठी आदित्य ठाकरे देश सोडण्याची शक्यता : नितेश राणे
    मुंबईत कामं होणार कधी? पुढच्या पावसाळ्यात सुद्धा खड्डे त्याच ठिकाणी दिसतील. BMC, MHADA, BPT RAILWAY यांच्यासोबत कामं न करता आज कुछ तुफानी करते है असं मुख्यमंत्र्यांकडून सुरू आहे, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

    आदित्य ठाकरे म्हणाले, कंत्राटदाराशी माझं काही वैर नाही. पण कामं त्यांनी करायला हवेत. मात्र ज्यांना मुंबईतील रस्त्याचे कंत्राट दिले आहे, त्यातील एक चिपळूणमध्ये कोसळलेला पुल ज्यांनी बांधला होता, ते आहेत, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed