मराठा आरक्षण आंदोलना दरम्यान आत्महत्या केलेल्या तरुणांना मदतीचा हात म्हणून भैरवनाथ उद्योग समुहाच्या वतीने ४५ कुटूंबांना प्रत्येकी ५ लाखांची मदत करण्यात येणार, असल्याची माहिती दिली. मराठा बांधवांनी आत्महत्या करू नये अशी विनंती तानाजी सावंत यांनी केली.
तानाजी सावंत म्हणाले की, पाहिलं आरक्षण मिळालं असताना ते रद्द झालं ते रद्द झाल्यानंतर वर्ष दोन वर्षे कोणी काही बोल नाही. आणि अचानक वादळ यावं तास आंदोलन कोण करतय? का करतय ? हे समजून घेण्यापेक्षा मराठी कुटुंबांना मदत करणं महत्वाचं आहे. आरक्षण मिळेल नाही मिळेल हा पुढचा भाग, पण ही मागणी अचानक का सुरू झाली हा ही प्रश्न आहेच, असं ते म्हणाले.
२०१४ साली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना राज्यात मराठ्यांना आरक्षण दिलं होतं. त्यानंतर या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले गेलं आणि तत्कालीन सरकारने योग्य भूमिका मांडली नाही? त्यांना आरक्षण का टिकवता आलं नाही असं थेट सवाल तानाजी सावंत यांनी या पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.
आरक्षण कधी मिळेल हे सांगायला मी काही पंचांग घेऊन बसलो नाही, हा लढा आहे. काही बाबी कायदेशीर आहेत, असं तानाजी सावंत म्हणाले. आज एका पद्धतीने शासनाची दमछाक करून आताच्या आताच आरक्षण द्या, कागदावर लिहून द्या अशी भूमिका घेतली जात आहे. पण आरक्षण टिकलं पाहिजे ते महत्वाचं आहे, असंही ते म्हणाले. या मुद्यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी तानाजी सावंत यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News
