• Tue. Jul 28th, 2026

    Kolhapur News: कोल्हापुरात माजी महिला सरपंचाला प्रियकराने संपवलं; बॉडी गाडी टाकून थेट मुंबई गाठली, पण भाच्यामुळे डाव फसला!

    Kolhapur News: कोल्हापुरात माजी महिला सरपंचाला प्रियकराने संपवलं; बॉडी गाडी टाकून थेट मुंबई गाठली, पण भाच्यामुळे डाव फसला!

    साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिरगावच्या माजी महिला सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे (वय 50) यांची त्यांच्या प्रियकराने लग्नासाठी तगादा लावल्याच्या रागातून निर्घृण हत्या केली. हत्या केल्यानंतर पुराव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपीने मृतदेह कारमध्ये ठेवून चक्क 350 किलोमीटरहून अधिक प्रवास केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याचा थरारक डाव फसला आणि भिवंडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. शाहुवाडी पोलीस ठाण्यात हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.

    पंढरपूर वारीचे आमिष दाखवून गोठ्यात आवळला गळा

    मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मयत सुरेखा न्यारे आणि आरोपी प्रकाश ऊर्फ बाबू आनंदा पाटील (वय 40) हे शिरगावमध्ये एकाच गल्लीत समोरासमोर राहत होते. सुरेखा यांच्या पतीचे दीड वर्षांपूर्वी निधन झाले होते, त्यानंतर न्यारे आणि पाटील कुटुंबातील जवळीक वाढली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. सुरेखा या प्रकाशकडे वारंवार लग्नासाठी तगादा लावत होत्या, मात्र प्रकाशला हे मान्य नव्हते.

    या त्रासातून कायमची सुटका करून घेण्यासाठी प्रकाशने सुरेखा यांची हत्या करण्याचा कट रचला. रविवारी 26 जुलै रोजी सकाळी 11 च्या सुमारास त्याने सुरेखा यांना ‘आपण पंढरपूरच्या वारीला जाऊ’ असे सांगून आपल्या गाडीत बसवले. मात्र, वारीला नेण्याऐवजी त्याने त्यांना गावाबाहेरील लिंडोरी येथील जनावरांच्या गोठ्यात नेले आणि तिथेच त्यांचा गळा दाबून खून केला.

    मृतदेह समुद्रात फेकण्याचा कट

    सुरेखा यांच्या हत्येनंतर केल्यानंतर कोणालाही संशय येऊ नये म्हणून प्रकाशने अत्यंत क्रूरपणे सुरेखा यांचा मृतदेह एका गोणीत भरून स्वतःच्या एम एच 09 जी झेड 6815 या इको गाडीच्या डिकीत लपवला. मृतदेहाची कायमची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मुंबई गाठून मृतदेह समुद्रात फेकण्याचे ठरवले होते.

    भाच्याच्या सतर्कतेमुळे आरोपी जेरबंद

    आरोपी सोमवारी सकाळी भिवंडीतील कशेळी परिसरात पोहोचला. तेथे त्याने आपला भाचा संदेश मोरे याला भेटून आपण खून केल्याची कबुली दिली आणि मृतदेह समुद्रात फेकण्यासाठी मदत मागितली. मामाचे हे भयानक कृत्य ऐकून भाचा हादरला आणि त्याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तातडीने नारपोली पोलिसांना माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कदबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून गाडीची झडती घेतली असता डिकीत सुरेखा यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी तत्काळ प्रकाश पाटीलला बेड्या ठोकल्या.

    पोलीस तपास आणि खळबळ

    या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी झिरो एफआयआर नोंदवला असून, पुढील तपासासाठी हे प्रकरण शाहूवाडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. सुरेखा न्यारे या अडीच वर्षे गावच्या सरपंच होत्या, त्यांच्या अशा अंतामुळे शिरगावसह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. शाहुवाडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed