• Sun. Sep 22nd, 2024
‘हॅप्पी’ दिवाळी! ठाणे पालिका कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर; गेल्या वर्षीच्या तुलनेत साडेतीन हजारांची वाढ

ठाणे: ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना यंदा २१ हजार ५०० रुपये सानुग्रह अनुदान सोमवारी जाहीर करण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या सानुग्रह अनुदानात साडेतीन हजारांची वाढ करण्यात आली आहे. तसेच आशा सेविकांनाही सहा हजारांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने ही वाढ करण्यात आली आहे. धनत्रयोदशीच्या आधी हे सानुग्रह अनुदान संबंधितांच्या बॅंक खात्यात जमा करण्याचे स्पष्ट निर्देश ठाणे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे यंदा ठाणे पालिका कर्मचाऱ्यांची ही ‘दिवाळी गोड’ होणार असून ‘हॅप्पी’ होणार आहे.
भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा; ७ नोव्हेंबरला एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण
ठाणे पालिकेचे ६ हजार २८२, शिक्षण विभागाचे ६९७ आणि परिवहन विभागाचे १५०० कायम कर्मचारी आहेत. पालिकेचे थेट कंत्राटी कर्मचारी आणि इतर असे ३७२ कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. तसेच पालिकेच्या घनकचरा विभागात रस्ते सफाईसाठी असलेल्या कंत्राटी कामगारांनाही देय असलेल्या रकमेनुसार सानुग्रह अनुदानाचे वितरण संबंधित कंत्राटदारामार्फत करण्यात येणार आहे. ठाणे पालिकेने गेल्या वर्षी १८ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान कर्मचाऱ्यांना दिले होते. त्यात साडेतीन हजार रुपयांची वाढ करून यंदा कर्मचाऱ्यांना २१ हजार ५०० रुपये देण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

मतदारांनी पती-पत्नीला निवडून दिलं, विजयानंतर जोडीनं गुलाल उधळत घेतलं देवीचं दर्शन

तर आशा सेविकांनाही गेल्यावर्षी प्रथमच पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले होते. त्यात एक हजारांची वाढ करण्यात आली आहे. या निर्णयामुळे, पालिकेवर सानुग्रह अनुदानापोटी सुमारे २० ते २२ कोटी इतका अतिरिक्त भार येणार आहे. याबाबत सोमवारी झालेल्या तातडीच्या ऑनलाईन बैठकीत सानुग्रह अनुदानाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह या बैठकीत झालेल्या चर्चेला ठाणे पालिका आयुक्त अभिजीत बांगर, माजी महापौर नरेश म्हस्के उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed