• Sun. Sep 22nd, 2024
खान्देशी गाणं म्हणत कांदानी लागण, चांगला भाव दिसन दिवाई गोड करा; शेतकऱ्यासनी मागणी

धुळे : एकीकडे संपूर्ण राज्यात आणि धुळे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू असून या निवडणुकीत कोणत्या ग्रामपंचायतीत कोणाची सत्ता येणार याकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून दुसरीकडे रब्बी हंगामाच्या तयारीला शेतकऱ्यांनी वेग धरला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय पक्ष व्यस्त असताना दुसरीकडे धुळे जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या कामांना शेतकऱ्यांनी वेग दिला असून सध्या या रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कांदा लागवडीचे काम सुरू आहे. शेतात अहिराणी भाषेतील विविध पारंपारिक गीते म्हणत महिला शेतमजुरांकडून शेतीची कामे सुरू आहेत. खरीप हंगामात शेतीचे झालेले नुकसान लक्षात घेऊन सरकारने मदत जाहीर करावी तसेच कांद्याला योग्य तो भाव मिळून द्यावा, अशी मागणी या शेतमजुरांनी व्यक्त केली आहे.

विजयानंतर भारताला मिळाली अजून एक गुड न्यूज, सामना संपल्यावर नेमकं घडलं तरी काय पाहा….
राज्यात कांद्याची मागणी वाढली असून, पुरवठा मात्र कमी आहे. अशा वेळी कांद्याच्या बाजारभावात वाढ होणे अपेक्षित असताना दरदिवशी दर घसरत आहेत. खराब हवामान आणि लांबलेला पाऊस यामुळे यावर्षी लाल कांद्याची लागवड उशिराने सुरू झाली. शिवाय कांद्याच्या दरात सततची होणारी घसरण आणि त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान त्यामुळे लाल कांद्याची लागवडही कमी आहे. शिवाय अजूनही लाल कांद्याची आवक अपेक्षेइतकी सुरू झालेली नाही. दर कमी होत असल्याने शेवटच्या टप्प्यात शिल्लक असलेल्या कांद्याला भाव मिळतील अपेक्षा शेतकरी करीत आहे.

एकच वादा विराट दादा… कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताचा दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed