• Sat. Sep 21st, 2024
लेकीच्या जन्माचं अनोखं स्वागत, मराठा आंदोलनावेळी जन्म, राजेगोरे दाम्पत्यानं नाव ठेवलं ‘आरक्षणा’ कारण…

नांदेड : मुलगा किंवा मुलगी जन्माला आल्यानंतर अनेक जण आपआपल्या आवडीनुसार नाव ठेवत असतात. नांदेडमध्ये मात्र एका वडिलांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान मुलगी झाल्याने तीच नाव चक्क ”आरक्षणा” ठेवलं आहे. मुलीच्या या नावाची नांदेडमध्ये सद्या चांगलीच चर्चा सुरु आहे.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील शेलगाव येथील आतम राजेगोरे या तरुणाचा विवाह दोन वर्षांपूर्वी गायत्री कंकाळ या तरुणीशी झाला होता. ३० ऑक्टोबर रोजी त्यांना मुलगी जन्मास आली. विशेष म्हणजे ज्या दिवशी मुलगी जन्मास आली तेव्हा राज्य भरासह नांदेडमध्येही मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु होतं. त्यात आतम राजेगोरे याचा सक्रिय सहभाग होता. राजगोरे यांनी देखील आरक्षणाच्या मागणीसाठी गावात उपोषणास बसले होते. मुलगी झाल्याने आतम राजगोरे आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. मराठा आरक्षण आंदोलनं काळात मुलीचा जन्म झाल्याने या दाम्पत्याने आपल्या मुलीचे नाव ”आरक्षणा” ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला कुटुंबियांतील इतर सदस्यांनी मुलीच्या या नावाला सहमती दर्शवली. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरु केले. कधी नव्हे असे ऐतिहासिक आंदोलन झाले आहे.

पावसामुळे सामना रद्द केला तर कोण ठरणार विजेता पाकिस्तान की न्यूझीलंड, जाणून घ्या नियम
यापूर्वी अनेक आंदोलने झाली मात्र असं आंदोलन कधीही झाले नाही. लाखो मराठा बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यामुळे या मराठा आरक्षण आंदोलनाची आठवण नेहमी राहावी यासाठी आपल्या मुलीचे नाव ”आरक्षणा” ठेवल्याचे आतम राजगोरे यांनी सांगितले. दरम्यान, राजगोरे दाम्पत्याने आपल्या मुलीचे ठेवलेले ”आरक्षणा” नाव सद्या सर्वत्र कौतुकाचा विषय बनला आहे.

२४ तासांत रिपेयर करेल Oppo तुमचा स्मार्टफोन; जाणून घ्या Oppo Service Centre 3.0 प्रोग्राम म्हणजे काय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed