• Sat. Sep 21st, 2024
कुणबी जातीचे प्रमाणपत्र वाटप; प्रशासनाच्या हाताने प्रमाणपत्र घेण्यास व्यक्तीचा नकार, कारण काय?

नांदेड: मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप केलं जात आहे. नांदेडमध्येही प्रमाणपत्र वाटपास सुरुवात झाली आहे. शनिवारी शहरात वास्तव्यास असलेले सत्यवान दिगंबरराव आंभोरे यांना कुणबी जातीचे पहिले प्रमाणपत्र मिळाले आहे. विशेष म्हणजे आंभोरे यांनी प्रशासनाच्या हाताने प्रमाणपत्र घेण्याऐवजी सकल मराठा समाजाच्या नेत्यांच्या वतीने हे प्रमाणपत्र स्विकारले आहे.
लोकसभेला महायुती किती जागा जिंकणार, एकनाथ शिंदे यांची विरोधकांची टेन्शन वाढवणारी घोषणा
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांना आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केले होते. त्यांच्या उपोषणाची दखल घेत शासनाने कुणबी मराठा नोंद असलेल्यांना कुणबी मराठा प्रमाणपत्र देणारअसल्याचे स्पष्ट केल्यानंतर नांदेड शहरातील सत्यवान आंभोरे यांनी या संबंधाने नांदेडच्या तहसील कार्यालयाकडे २६ ऑक्टोंबर रोजी ऑनलाईन प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यांना कुणबी मराठा नोंद असलेले प्रमाणपत्र देण्यात आले आहे. दरम्यान जिल्ह्यातील माहुर तालुक्यातील मदनापूर येथील काही मराठा बांधवांना आज कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. राजेश टमटने, अनुष्का टमटने, अवंती टमटने यांना माहुर येथील तहसिलदार किशोर यादव यांनी कुणबी प्रमाणपत्र वाटप केले आहे.

गैरसमज दूर करण्याचा केला प्रयत्न, प्रकाश सोळंके मनोज जरांगेंच्या भेटीला

जिल्ह्यात १९६७ पुर्वीच्या कुणबी समाजाच्या ५८९ नोंदी सापडल्या आहेत. या नोंदीच्या आधारे त्यांच्या वंशातील पुढचे लोक हे प्रमाणपत्र घेऊ शकतील. शासनाच्या सुचनेनुसार या सगळया नोंदी जिल्हयाच्या संकेतस्थळावर गुरूवारपर्यंत गावनिहाय प्रकाशित करण्यात येत आहेत. या नोंदीनुसार प्रमाणपत्र घेऊन जाऊ शकतील. याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्राचे वाटप सुरू होईल. ५८९ नोंदीच्या आधारे जवळपास पहिल्या टप्यात पाच हजार जण याचा लाभ घेऊ शकतील, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच नांदेड जिल्हयात मागील पाच वर्षात ९० लोकांनी कुणबी प्रमाणपत्राची मागणी केली होती. यासर्वांना प्रमाणपत्र दिले होते. आजूनही कागदपत्र शोधण्याचे काम सुरू आहे. भुमि अभिलेखच्या रेकॉर्डमध्ये जास्त नोंदी सापडतील, असा विश्वास आहे, असेही जिल्हाधिकारी राऊत म्हणाले.

अर्जुन राठोड यांच्याविषयी

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed