• Sat. Sep 21st, 2024
दारूला पैसे देण्यास नकार, माय-लेकामध्ये कडाक्याचं भांडण; नंतर जे घडलं ते धक्कादायक

कोल्हापूर : व्यसनाच्या आहारी गेलेल्या पोटच्या गोळ्याने दारूला पैसे दिले नाहीत म्हणून आईचाच निर्घृण खून केल्याची घटना कोल्हापुरातील कागल तालुक्यातील वंदूरमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी निलेश वाईंगडे याला कागल पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

शेतमजुरी करून उदरनिर्वाह करत असलेल्या कागल तालुक्यातील वंदूर येथील सुनिता अशोक वाईंगडे (वय ५१) यांच्याशी मुलगा निलेश वाईंगडे याची दारूच्या पैशावरून वारंवार भांडण होत होती. शेजाऱ्यांनी अनेकवेळा मायलेकरांचा हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, बुधवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत घरी आलेल्या निलेशने आईसोबत दारूला पैसे देत नाही म्हणून पुन्हा वाद केला. या वादातून निलेशने आई सुनीता यांच्यावर खुरप्याने वार केले, तसेच नायलॉनच्या दोरीने गळा आवरून तिचा खून केला.

नशिबाने दगा दिला; भारताची एक नव्हे दोन शतकं हुकली, शुभमन पाठोपाठ विराटचे विक्रमी शतकाची प्रतिक्षा वाढली
आज सकाळी शेजारच्यांना ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी कागल पोलिसांना याबाबतची माहिती दिली. कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार, उपनिरीक्षक रविकांत गच्चे यांच्यासह वैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कागल ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. दिवसभर काबाडकष्ट करून सुनीता वाईंगडे यांनी आपल्या मुलाला मोठे केलं होतं. मात्र, निलेश वांगडे दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला होता.

दररोज दारू पिऊन निलेश घरी यायचा, कोणताही कामधंदा करत नसल्याने आईसोबत त्याचा वारंवार वाद होत होता. बुधवारी संध्याकाळीही असाच प्रकार घडला आणि यानंतर निलेशने जन्मदात्या आईचाच निर्घृण खून केला यानंतर. नातेवाईकांनी मृतदेह पाहून केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. पोलिसांनी निलेशला ताब्यात घेतल्यानंतर नशेतच असलेल्या निलेशला काय केलं आहे? याची पुरेशी कल्पनाही नव्हती. दारूच्या नशेत पोटचा गोळाच कर्दनकाळ ठरल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.

ED Official: ईडीच्या अधिकाऱ्याला १५ लाखांची लाच घेताना अटक, राजस्थान एसीबीच्या कारवाईनं देशभरात खळबळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed