• Sat. Sep 21st, 2024

निवृत्तीच्या उंबरठ्यावर पावणे सहा लाखाची लाच, घरात गादीखाली ५०० चे बंडलं अन्…

निवृत्तीच्या उंबरठ्यावर पावणे सहा लाखाची लाच, घरात गादीखाली ५०० चे बंडलं अन्…

नांदेड: सेवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्याला निविदा मंजूर करण्यासाठी ६ लाख ४० हजार रुपयाची लाच घेतल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. यासोबतच अन्य एका वरिष्ठ लिपिकाला देखील ताब्यात घेतले आहे. बुधवारी मध्यरात्री लाच लुचपत विभागाने ही कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान मुख्य अभियंत्याच्या घराची झडती घेतल्यानंतर ७२ लाख ९१ हजार रुपये रोकड सापडली आहे.

गंजेद्र हिरालाल राजपूत (वय ५४) असं अटक करण्यात आलेल्या अधीक्षक अभियंताचे नाव आहे. एका क्लासवन अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागात एकच खळबळ उडाली आहे.

ट्यूशन टीचर, विद्यार्थ्याचा मृत्यू, एक पत्र अन् स्कूटर; असं उलगडलं कुशाग्रच्या हत्येचं रहस्य
यातील एका कंत्राटदाराला जिल्ह्यातील केदारगुडा, पिंगळी, डोंगरगाव, हदगाव, गोरलेगाव, गुरफळी या रस्त्याच्या कामाचे टेंडर मिळाले होते. तब्बल १४ कोटी १० लाख रुपयाचं हे काम आहे. या कामाची निविदा मंजूर करण्यासाठी अधीक्षक अभियंता गजेंद्र राजपूत यांनी सुरुवातीला ७ लाख रुपयाची लाच मागितली होती. तसेच, कार्यालयातील वरिष्ठ लिपिक विनोद कंधारे यांनी देखील शिफारसीसाठी तक्रारदारास ५० हजाराची मागणी केली होती. दरम्यान, तोडजोडीनंतर ६ लाख ४० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर कंत्राटदाराने लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयात सापळा रचला. यादरम्यान, अधीक्षक अभियंताच्या सांगण्यावरून कार्यलयातील लिपिक विनोद केशवलाल कंधारे एसीबी अधिकाऱ्यांच्या समक्ष लाचेची रक्कम स्वीकारली. लाच स्वीकारताच लिपिकाला अटक केली, तर अधीक्षक अभियंता गजेंद्र राजपूत यांना राहत्या घरून ताब्यात घेतले. याप्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधीक्षक अभियंताच्या घराची झडती, लाखोंची रोकड जप्त

दरम्यान, या कारवाईनंतर लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता गजेंद्र राजपूत यांच्या कार्यालया सह घराची झडती घेतली. या झडती दरम्यान दोन डीवायएसपी, चार पोलिस निरीक्षकासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते. कारवाई दरम्यान कपाटात आणि गादीखाली ५०० रुपयाचे बंडल आढळून आले. जवळपास ७१ लाख ९१ हजार ४९० रुपयाचे रोकड आढळून आले. पैसे मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना पहिल्यांदाचं मशीनचा वापर करावा लागला. मध्यरात्री २ वाजे पर्यंत ही कारवाई चालली.

Explainer: मुंबईतील हिऱ्यांची बाजारपेठ सुरतला जाण्याचा धोका? नेमका काय परिणाम होणार?
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed