सोलापूर: मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरु आहे. राज्यातील विविध भागांमध्ये साखळी उपोषणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय समोर मराठा आरक्षणासाठी अन्न त्याग करून करून प्रकाश डांगे व प्रशांत देशमुख हे मराठा बांधव गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. डांगे आणि देशमुख यांनी अन्न त्याग केल्याचा आज सहावा दिवस आहे. सकल मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा बांधव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आले होते. मराठा समाजातील नेत्यांची भाषणे सुरू असताना आमरण उपोषणाला बसलेले प्रशांत देशमुख यांचा रक्तदाब कमी होऊन त्रास सुरू झाला.त्यावेळी मराठा बांधवानी ताबडतोब वैद्यकीय सहायता उपलब्ध करून देण्यात आली.
प्रशांत देशमुख यांची प्रकृती बिघडल्याचं कळताच त्यांचं संपूर्ण कुटुंब उपोषणाच्या ठिकाणी दाखल झाले.शासकीय रुग्णालयातील डॉ. विशाल गोरे यांनी प्रशांत देशमुख यांच्यावर उपचार करून सलाईन लावले. प्रशांत देशमुख यांच्या पत्नी मनीषा देशमुख यांना यावेळी अश्रू अनावर झाले.मी टीव्हीवर पाहिले,माझ्या पतीची तब्येत खालावली आहे.तोंडातला घास पडला,सगळं सोडून एका मुलीला घेऊन उपोषण ठिकाणी आले असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
मरेन पण उपोषण सोडणार नाही;उपोषणकर्त्याचा निर्धार

आमरण उपोषणाला बसलेले प्रशांत देशमुख यांनी सलाईन लावूनच प्रतिक्रिया दिली.मरेन पण मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सोडणार नाही.जोपर्यंत मनोज जरांगे पाटलांचा आदेश येत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार अशी प्रतिक्रिया प्रशांत देशमुख यांनी दिली.देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजावर गुन्हे दाखल करण्याची भाषा करत आहेत.या उपमुख्यमंत्र्यावरच गुन्हे दाखल करा, अशी मागणी देशमुख यांनी केली. गुणवंत सदावर्ते यांचा देखील देशमुख यांनी समाचार घेतला.माझा जीव गेला तरी मी इथून उठणार नाही अशी भूमिका प्रशांत देशमुख यांनी मांडली.
दरम्यान, राज्यातील विविध भागात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु असल्याचं चित्र आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News