• Sat. Sep 21st, 2024
सर्वपक्षीय नेते बिल्डरच्या घशात जागा घालतात, अशी अनेक उदाहरणे, बोरवणकर यांचा गंभीर आरोप

मुंबई : “मॅडम कमिशनर या पुस्तकाच्या निमित्ताने येरवडा येथील जागा बिल्डरच्या घशात जाण्यापासून कशी वाचली, हे राज्याच्या समोर आलं. तत्कालिन राजकीय नेत्यांनी दबाव टाकूनही मी नमले नाही, माघार घेतली नाही. त्यामुळे संबंधित जागा आजही गृह खात्याकडे आहे. पण अनेक शासकीय जागा बिल्डराच्या घशात घालण्याचं काम राजकीय नेते करत असतात. यात केवळ एका पक्षाचेच राजकीय नेते असतात असं नाही तर यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा सहभाग आहे”, असा गंभीर आरोप सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी केला.

मीरा बोरवणकर यांनी लिहिलेलं मॅडम कमिशनर हे पुस्तक संपूर्ण देशभरात चर्चेत आहे. अंडरवर्ल्डसंबधी आलेले अनुभव, जळगाव सेक्स स्कँडल, मुंबई कामाठीपुरा दंगल, राजकीय नेते आणि खासगी बिल्डर यांचे लागेबांधे अशा अनेक विषयांचं आणि प्रसंगांचं वर्णन बोरवणकर यांनी पुस्तकात केलं आहे. पुण्यातील येरवडमधील शासकीय जागा बिल्डरच्या घशात जाण्यापासून कशी वाचली, याचा किस्सा बोरवणकर यांनी पुस्तकात लिहिलाय. यामध्ये पुण्याचे तत्कालिन पालकमंत्री अजित पवार यांचं नाव आल्याने त्याची राज्यात सर्वाधिक चर्चाही झाली. त्याचनिमित्ताने ‘मटा कॅफे’मध्ये आलेल्या बोरवणकर यांनी खासगी बिल्डर आणि राजकीय नेत्यांच्या भ्रष्ट संबंधावर रोखठोक मत मांडलं.

अजितदादांच्या त्या प्रकरणाचे पडसाद, बोरवणकर यांचं तिकीट कॅन्सल, मटा कॅफेत पहिल्यांदाच गौप्यस्फोट
बोरवणकर म्हणाल्या, “पुण्यातील येरवड्याचं केवळ एक उदाहरण नाहीये. राज्यात अशी अनेक उदाहरणं आहेत, जिथे राजकीय नेत्यांनी बिल्डरांचं भलं करण्यासाठी लिलाव करून त्यांना जागा दिलेल्या आहेत. यामध्ये पोलिसांच्या जागांचं सगळ्यात जास्त नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर इतर देखील विभागांच्या जागा खासगी बिल्डरला देण्यात आलेल्या आहेत”

“पण यात केवळ एकाच पक्षाचे लोक आहेत, असं नाहीये. सर्वपक्षीय नेत्यांचे हितसंबंध खासगी बिल्डरांबरोबर असतात आणि ते मॅनेज करण्याचा कार्यक्रम करत असतात, असा माझा सगळ्यांवरच आरोप आहे. राज्यातल्या भरपूर ठिकाणी शासकीय खात्यांना जागांची गरज असताना राजकीय नेत्यांनी ती जागा लिलाव करून बिल्डरांना दिलेल्या आहेत”, असा गंभीर आरोप बोरवणकर यांनी केला.

अजित पवारांना भिडल्या, अंडरवर्ल्डला नडल्या; मीरा बोरवणकर यांनी उलगडला ‘मॅडम कमिश्नर’ होण्याचा प्रवास

येरवड्यात नेमकं काय घडलं होतं?

येरवडा पोलिस ठाण्याचा तीन एकरचा भूखंड हा टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) त्यावेळी अटक केलेल्या ‘डीबी रिअॅल्टी’ या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर शाहीद बलवा याच्या कंपनीला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपवर विकसित करण्याच्या निर्णयास पुण्याच्या तत्कालिन पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी विरोध केला होता. तत्कालिन पालकमंत्री अजित पवार यांनी मीरा बोरवणकर यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण तो विरोध न जुमानता बोरवणकर यांनी जागा देण्यास नकार दिला. तोच सगळा प्रसंग बोरवणकर यांनी पुस्तकात कथन केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed