• Sat. Sep 21st, 2024
पाकिस्तानकडून ८० भारतीय मच्छिमारांची सुटका; १० नोव्हेंबरला भारताकडे सुपूर्द करणार

मुंबई: पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या ८० भारतीय मच्छिमारांची सुटका करण्यात येणार असून त्यांना १० नोव्हेंबरला भारताच्या ताब्यात दिले जाणार आहे. पाकिस्तान-भारत शांतता प्रक्रियेसाठी काम करणारे कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांनी महाराष्ट्र टाइम्सला ही माहिती दिली. १ जुलै, २०२३ रोजी पाकिस्तानने भारताकडे दिलेल्या कैद्यांच्या यादीनुसार २६६ भारतीय मच्छिमार पाकिस्तानी तुरुंगात होते. त्यापैकी दोन मच्छिमारांचा कराचीच्या तुरुंगात मृत्यू झाला होता.
विद्यमान आमदारांपुढे पत्नीचे कडवे आव्हान; भाजपचे गणित बिघडण्याची शक्यता
पाकिस्तानी तुरुंगात असलेल्या मच्छिमारांपैकी १९ मच्छिमार पालघर जिल्ह्यातील आहेत. मात्र सुटका होणाऱ्या मच्छिमारांच्या यादीत यापैकी कोणी आहे का, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. मे महिन्यात पाकिस्तानकडून ५०० मच्छिमारांची तीन टप्प्यांत सुटका करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यापैकी दोन टप्प्यांत मच्छिमार मायदेशी परतले. मात्र अखेरच्या टप्प्यातील मच्छिमारांची घरवापसी रखडली होती. सध्या पाकिस्तानचे ६८ मच्छिमार भारतीय तुरुंगात होते. दरम्यान, पाकिस्तानी तुरुंगात असलेल्या पालघरमधील मच्छिमारांच्या कुटुंबांना दररोज ३०० रुपयांची मदत देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र गेले पाच महिने त्यांना एक रुपयाची मदतही सरकारकडून मिळालेली नाही. घरातील कमावता माणूसच सीमेपल्याड तुरुंगात अडकून पडल्याने या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.

विरोधक बाऊंसर टाकणार का सरपटी हा प्रश्न असतो, मी सचिनचं नाव घेतो | एकनाथ शिंदे

गेल्या तीन महिन्यांत पाकिस्तान तुरुंगात असलेल्या मच्छिमारांपैकी दोघांचा मृत्यू झाला. ६ ऑक्टोबरला जगदीश मंगल यांना मृत्यूने गाठले, तर ९ ऑक्टोबरला भूपतभाई जीवाभाई यांचा तुरुंगात मृत्यू झाला. या दोघांचे मृतदेह ताब्यात मिळण्यासाठीही नातेवाईकांना बरीच प्रतीक्षा करावी लागली होती. दुर्दैवाची बाब म्हणजे या दोघांचा शिक्षेचा कालावधी आधीच संपला होता. त्यांची वेळेत सुटका झाली असती तर ते स्वगृही आपल्या कुटुंबात असू शकले असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed