शरद पवार, दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात व विश्वजित कदम यांचा जुन्नर दौरा रद्द
पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील विघ्नहर साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ दि.02 नोव्हेंबर रोजी खा.शरद पवार यांच्या हस्ते व राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षेखालील होणार होता. या कार्यक्रमासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम उपस्थित राहणार होते. मात्र मराठा आरक्षणाचे आंदोलन राज्यात तीव्र झाले असल्याने व आंदोलकांनी राजकिय नेत्यांना गावबंदी केलेली असल्यामुळे या सर्व राजकिय नेत्यांचा जुन्नर दौरा रद्द करण्यात आल्याची घोषणा विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दीली.
