• Sat. Sep 21st, 2024
आमच्या जरांगे दादाची काळजी घ्या; तरुणानं चिठ्ठीत लिहिलं, अन् आरक्षणासाठी जीवनयात्रा संपवली

छत्रपती संभाजीनगर: ‘माझ्या समाजाला आरक्षण मिळावे आणि माझ्या जरांगे दादांची काळजी घ्यावी ही विनंती, जगाला राम राम ’ असा आशयाची चिठ्ठी लिहून कोलठाण (ता. छत्रपती संभाजीनगर) येथील एका शेतात शुभम अशोक गाडेकर (२४) या तरुणाने झाडाला दोरीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद चिकलठाणा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
जोडप्यात वारंवार वाद; कुटुंबही त्रस्तावलं, रागात पतीचे धक्कादायक कृत्य, अन् गाठलं पोलीस स्टेशन
या प्रकरणात चिकलठाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम अशोक गाडेकर हा महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कामाला होता. तीन ते चार महिन्यांपूर्वी तो कामाला लागला होता. मंगळवारी सकाळी आठच्या दरम्यान शुभम अशोक गाडेकर याने शेतात जाऊन झाडाच्या फांदीला दोरी बांधून गळफास घेतला. शुभमच्या आत्महत्येची माहिती मिळताच गावकरी जमा झाले. चिकलठाणा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. शुभमने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी ताब्यात घेण्यात आली.

कार्यक्रम रद्द करण्याची मागणी; विश्वजीत कदमांभोवती मराठा आंदोलकांचा गराडा

शुभमचा मृतदेह घाटी रूग्णालयात आणण्यात आला. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शवविच्छेदनानंतर शुभमच्या नातेवाईकांनी तसेच गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चेची मागणी केली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी पोहोचले. गावकरी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली. शुभमच्या नातेवाईकांना प्रशासनाच्या वतीने मदतीचा धनादेश देण्यात आला. शुभम परिवारामध्ये वडील, आई, भाऊ आणि बहिण असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed