मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील झोळे गावातील रहिवाशी असलेला सागर भाऊसाहेब वाळे या (वय 25) तरुणाने मंगळवारी पहाटे आपल्या राहत्या घराच्या मागील बाजूस पत्राच्या शेडमध्ये जाऊन गळफास घेतला. त्याच्याकडे सुसाइड नोट मिळाली असून त्यात त्याने लिहिले आहे की, “आम्ही जातो आमच्या गावा,एक मराठा लाख मराठा, आम्हाला आरक्षण नसल्यामुळे मी फाशी घेत आहे कोणाला जबाबदार धरू नये, एक मराठा लाख मराठा, आपला लाडका सागर मराठा” असे लिहिले आहे. सदर घटनेने संगमनेर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान आज आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे. कोल्हापूरचे श्रीमंत शाहू छत्रपती यांनी उपोषणस्थळी जात मनोज जरांगे यांची भेट घेतली. तसेच त्यांना प्रकृती जपण्याचाही सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आज सकाळी जरांगे पाटलांशी फोनवरुन चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी जरांगे पाटलांच्या तब्येतीची माहिती घेतली. मुख्यमंत्र्यांशी झालेली चर्चा समाधानकारक झाल्याने जरांगे पाटील यांनी पाणी घेतले. यावेळी जरांगे यांनी अर्धवट आरक्षण घेणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांना ठणकावून सांगितले.
Read Latest Maharashtra News And Marathi News