• Mon. Nov 25th, 2024

    मराठा समाजाला आपली गरज, उपोषण मागे घ्या, आम्ही सोबत आहोत; मिटकरींचे जरांगे पाटलांना आवाहन

    मराठा समाजाला आपली गरज, उपोषण मागे घ्या, आम्ही सोबत आहोत; मिटकरींचे जरांगे पाटलांना आवाहन

    अकोला : मराठा आरक्षणाचा प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर तुफान दगडफेक झाली असून याशिवाय घराबाहेर असलेल्या गाडीचीही जाळपोळ करण्यात आली. त्यातच आता अजित पवार गटाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे आमदार अमोल मिटकरी यांनी विधिमंडळाचं अधिवेशन बोलावून चर्चा करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

    मिटकरी म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे व घटनात्मक चर्चा व्हावी, याकरिता विधिमंडळाचे अधिवेशन लवकरात लवकर बोलवण्यात यावं. यासाठी आज मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्र्यांना पत्राव्दारे मागणी केल्याचे ते म्हणाले. जरांगे पाटील मराठा समाजाला आपली गरज आहे, तुर्तास उपोषण मागे घ्यावं, अन् हा लढा सुरूच ठेवावा, आम्ही आपल्यासोबत आहोत असेही मिटकरी म्हणाले.

    मुख्यमंत्र्यांसह मराठा बांधवांचा आग्रह मनावर, मनोज जरांगे सातव्या दिवशी पाणी पिण्यास राजी
    पुढे पत्रनिवदेनातून म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या न्याय मागणीसाठी संविधानिक गांधी मार्गाने जरांगे पाटील आमरण उपोषण करीत आहेत. आज उपोषणाचा सातवा दिवस आहे. त्यांनी प्राण पणाला लावले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आज सरकारनं मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीनंतर जस्टीस शिंदे यांच्या अहवालानुसार मुख्यमंत्री यांची पत्रकार परिषदेमध्ये ‘कुणबी’ अशी नोंद असलेल्या लोकांना प्रथम टप्प्यात कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय जाहीर केलाय. त्यामुळे सरकार आरक्षण देण्याच्या बाजुनं सकारात्मक पाऊले उचलत आहे. याचे समाधान आहे, पण मराठा समाज हा शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळं त्याला वंचित ठेवता येणार नाही. त्यामुळे कायमस्वरुपी टिकणारे आरक्षण देण्याबाबत सरकारने पाऊले उचलणे गरजेचे आहे. यासाठी चर्चा घडवून आणण्याकरिता अतितात्काळ विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलविण्यात यावं. अशी मागणी मिटकरींनी पत्र निवेदनातून केली आहे.
    मांडीवर वर्षाचं बाळ, राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे उपोषणाला, मराठा आरक्षणाची मागणी

    तुर्तास उपोषण मागे घ्या अन् हा लढा सुरूच ठेवावा, आम्ही सोबत आहोत

    संघर्षयोद्धा जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या पुढील दिशा मजबुत करण्यासाठी समाजाला त्यांची खूप गरज आहे. त्यामुळे त्यांनी तुर्तास उपोषण मागे घेऊन हा लढा सुरूच ठेवावा, आम्ही आपल्यासोबत आहोत. मराठा समाजाला नव्यानं आरक्षण द्यायचं नसून छत्रपती शाहू महाराजांनी दिलेले आरक्षण पुर्नःप्रस्थापित करायचे आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांतून जन्मलेलेल्या आरक्षणापासून मराठा समाजाला वंचित ठेवता येणार नाही. याकरिता सरकारने वेळ काढू नये, तात्काळ निर्णय घ्यावा, अशी विनंती देखील मिटकरींनी घातली आहे.

    चिमुकलीचे प्रश्न, काकांकडून उत्तरं जाणून घेण्याची तळमळ पाहताना मनोज जरांगेंच्या चेहऱ्यावर हसू फुललं

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed