• Mon. Nov 25th, 2024

    शेतकऱ्यांना अल्पदिलासा! आवक मंदावल्याने कांदा खातोय भाव, प्रतिक्विंटल ३०० ते ८०० रुपयांनी वाढ

    शेतकऱ्यांना अल्पदिलासा! आवक मंदावल्याने कांदा खातोय भाव, प्रतिक्विंटल ३०० ते ८०० रुपयांनी वाढ

    निफाड : उन्हाळ कांद्याची आवक मंदावल्याचे चित्र असून, त्यामुळे कांद्याच्या दरात गेल्या १५ दिवसांत ३०० ते ८०० रुपयांनी वाढ झाली आहे. चाळीमध्ये कांदा साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांना शेवटी शेवटी कांदा दरात दिलासा मिळाला आहे.

    दरम्यान, कांद्याचे बाजारभाव वाढले तरी शेतकऱ्याकडे कांदा शिल्लक नसल्याने शेतकरी वाढलेल्या बाजारभावावर नाराज असून, आता दहा हजार रुपये जरी बाजारभाव झाला तरी याचा आम्हाला काय उपयोग, असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहेत.
    कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ऐन सणासुदीत उन्हाळ कांद्यांना अच्छे दिन, किती मिळाला भाव?
    गत सप्ताहातील कांदा आवक (प्रतिक्विंटल, दर रुपयांमध्ये)
    लासलगाव बाजार समिती (मुख्य बाजार)

    उन्हाळ कांदा : ४४,३३०
    किमान : १,५००
    कमाल : ५,८२०
    सरासरी : ४,४००

    लाल कांदा : १३०
    किमान : १,००८
    कमाल : ४,९००
    सरासरी : ३,४२२

    लासलगाव बाजार समिती (निफाड उपबाजार)
    उन्हाळ कांदा : ८,६६५
    विंचूर उपबाजार आवार
    उन्हाळ कांदा : ३७,८७७ क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed