• Sat. Sep 21st, 2024
प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या घरी काळा धागा अन् संशयास्पद वस्तू; सत्तेसाठी अघोरी प्रकार

चंद्रपूर : सत्ता प्राप्तीसाठी माणूस कुठल्याही स्तरावर जाऊ शकतो. याचा प्रत्यय चंद्रपूर जिल्ह्यात आला आहे. जिल्हातील राजुरा शहरातील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत बापूजी पाटील मामुलकर प्रतिष्ठानच्या निवडणूकीपुर्वी अघोरी प्रकार पुढे आला.आपल्यालाच सत्ता मिळावी, यासाठी संस्थेतील एका संचालकाने इत्तर संचालकांच्या घरी काळा धागा बांधला, हळद, कुंकू लावले. संशयास्पद वस्तू ठेवल्या. या वस्तू निदर्शनास येताच संचालक हादरले. सीसीटीव्हीमूळे हा प्रकार उघडकीस आला. या अघोरी प्रकाराची तक्रार राजुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. संचालक मेघा नलगे आणि त्यांचे तीन नातेवाईक यांच्या विरोधात ही तक्रार करण्यात आली आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील राजुरा शहरातील बापूजी पाटील मामुलकर प्रतिष्ठान या संस्थेतर्फे काही शाळा संचालित आहेत. या संस्थेमध्ये संचालक म्हणून अविनाश जाधव, अॅडव्होकेट अरुण धोटे, सुमनताई मामुलकर, अरुण धोटे, डॉ. एस. एम. वारकड, बी. यु. बोर्डेवार, सुदर्शन निमकर, मेघा नलगे, दत्तात्रय येगीनवार, राजेंद्र जाधव हे सदस्य आहेत. संस्थेचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने सहाय्यक धर्मदाय आयुक्त चंद्रपूर यांच्या आदेशाने निवडणूक घेण्यात आली.

छत्रपतींची शपथ घेण्यापेक्षा…. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नगरच्या मराठा कार्यकर्त्याचे खरमरीत पत्र
सत्ता आपल्याकडे असावी यासाठी विरोधातील सहा संचालकांच्या घरात काळा धागा, हळद, कुंकू लावले आणि काही संशयास्पद वस्तू ठेवण्यात आल्या. अविनाश जाधव, अॅडव्होकेट अरुण धोटे, डॉ. एस. एम. वारकड, बी. यु. बोर्डेवार, दत्तात्रय येगिनवार यांच्या घरी या वस्तू आढळून आल्यात. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला. हा प्रकार उघडकीस येताच एकच खळबळ उडाली. सत्ता प्राप्तीसाठी थेट जादुटोण्याचा आधार घेतल्याने या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. या प्रकाराने संचालकांचे कुटुंबीय भयभीत झाले आहेत. हा प्रकार उघडकीस येताच घरी आणि शेजारच्या सीसीटीव्ही फुटेज बघितले गेले. त्यात तीन महिला आणि एक पुरूष दिसून आला.

असा घडला प्रकार…

संचालक घरी नसतांना त्यांच्या घरी तीन महिला, एक पुरुष गेले. कुटुंबियांकडून त्यांनी पाणी मागितलं. पाणी आणण्यासाठी ते गेले असता नेमके त्याच वेळी सोफ्याच्या आत काही वस्तू त्यांनी ठेवल्या. दरम्यान, या प्रकाराची तक्रार राजुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेज, ऑडीओ रेकॉर्डींग आणि सापडलेल्या वस्तू राजुरा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या आहेत. या प्रकाराची तक्रार मिळालेली आहे. तक्रारीच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक
योगेश्वर पारधी यांनी दिली.

पाकिस्तानचा रडीचा डाव, रिझवान मैदानात भांडायलाच लागला, व्हिडिओमध्ये पाहा नेमकं घडलं तरी काय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed