• Sat. Sep 21st, 2024
मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी उद्या APMC मार्केट बंद, काय सुरू-काय बंद राहणार? वाचा…

नवी मुंबई : मराठा समाज आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एपीएमसी मार्केटमधील माथाडी कामगार संघटनेने उद्या शुक्रवार २७ ऑक्टोबर रोजी एक दिवसीय लाक्षणिक बंद पुकारला आहे. त्यामुळे कांदा बटाटा, मसाला आणि धान्य मार्केटमध्ये कडकडीत बंद पाळला जाणार आहे. मात्र भाजीपाला आणि फळ मार्केट मात्र नेहमीप्रमाणे सुरूच असणार आहे.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली ४० दिवसांची मदुत संपली आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा आंदोलनाचे शस्त्र उगारले आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एपीएमसी मार्केटमधील माथाडी कामगारांनी पाठिंबा दर्शविला आहे. हे सर्व कामगार उद्या शुक्रवारी लाक्षणिक संपावर जाणार आहेत.

राजकीय नेत्यांनी पोस्ट टाकली की ‘भावपूर्ण श्रद्धांजली’च्या कमेंट, मराठा समाज आक्रमक, आरपार लढाईचा एल्गार
मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मार्केटमध्ये माथाडी कामगारांची एक बैठक पार पडली. या बैठकीला कामगार नेते शशिकांत शिंदे आणि नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते. या बैठकीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

मराठा आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना गावबंदी, पद गेलं तरी समाजासोबत,अहमदनगरमधील करंजीच्या उपसरपंचाचा इशारा
जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सांगलीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मशाल आंदोलन

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून सांगलीत आज सकल मराठा समाजाच्या वतीने मशाल रॅली काढण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली. सकल मराठा समाजातर्फे उद्यापासून साखळी उपोषण करण्यात येणार आहे. ग्रामीण भागामध्ये मराठा समाजाच्या वतीने राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. पण शहरासारख्या ठिकाणी हे शक्य होत नसल्याने शहरांमध्ये जर कोणत्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम होत असेल तर तो कार्यक्रम उधळून लावला जाईल, असा इशारा देखील यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed