• Sat. Sep 21st, 2024
पाच मित्र पोहण्यासाठी तलावात उतरले; मात्र नियतीनं साधला डाव, अन् गाव हळहळलं

रायगड: जिल्ह्यात पनवेल येथे दोन शाळकरी मुले तलावात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर तालुक्यातही अशीच दुर्दैवी घटना घडली होती. त्यामुळे लहान मुलांवर पालकांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे. पनवेल येथील या घटनेत तीन जणांना वाचवण्यात मोठे यश आहे. मात्र दोन मुलांचा दुर्दैवीरित्या बुडून मृत्यू झाला आहे.
दुर्गा विसर्जनात अपघात; ९ मुले जखमी, तरुण देवदूत बनले, अन् वाचवले चिमुकल्यांचे प्राण
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेल तालुक्यातून एक अत्यंत दुःखद घटना घडली आहे. तालुक्यातील साई गावामध्ये २ अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. दिनांक २४ ऑक्टोबर रोजी दुपारी साडे ३ वाजण्याच्या सुमारास साई गावाबाहेरील शिव मंदिर शेजारी असलेल्या तलावात १२-१३ वयोगटातील ५ अल्पवयीन मुले पोहायला गेली होती. त्यातील इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेणारा ओमकार रमेश पवार आणि प्रीतम तुकाराम म्हात्रे या दोघांना तळ्यातील खोल पाण्याचा अंदाज आला नाही. ते गटांगळ्या खाऊ लागले आणि काही वेळातच खोल पाण्यात बुडाले.

पिंपरी चिंचवडपासून नांदेडपर्यंत आवाज बुलंद, ४० वर्ष भाजपशी एकनिष्ठ, एकनाथ पवार ठाकरेंसाठी पॉवरफुल ठरणार?

हे दोघेही जीवाच्या आकांताने धडपड करत होते. मात्र पाण्याबाहेर येऊ शकले नाहीत आणि त्याचच त्यांचा बुडून मृत्यू झाला. मात्र यापैकी ३ मुलांना वाचवण्यात यश आलं आहे. या अत्यंत दुःखद घटनेने परिसरात खेद व्यक्त होत आहे. ओंकार आणि प्रीतमच्या धक्कादायक जाण्याने दोन्ही कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघी १२ वर्षांची मुलं खोल पाण्यात पोहायला जाऊन मृत्युमुखी पडल्याच्या वृत्ताने परिसरातील पालकदेखील सुन्न झाले आहेत. मुलांवर वेळीच लक्ष दिले असते तर असे अघटित घडले नसते, असे अशा भावना आता व्यक्त होत आहेत. या मोठ्या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed